आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For IAS State Administive Officers Now Give Examination

राज्यातील प्रशासकीय अधिका-यांना आयएएस दर्जासाठी आता द्यावी लागणार परीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर - राज्य प्रशासकीय सेवेतील अधिका-यांना आयएएस दर्जा मिळवायचा असेल तर आगामी काळात एक वेगळी परीक्षा द्यावी लागेल. शिवाय परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मुलाखतीला सामोरे जावे लागेल. या प्रस्तावाला केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असून राज्य सरकारचे यावर म्हणणे मागवले आहे. केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला विविध राज्यांतील अधिका-यांनी मात्र विरोध दर्शवला आहे. पुढील वर्षापासून या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी होऊ शकते.


राज्यातील अधिका-यांच्या परीक्षेचा अभ्यासक्रम राज्य सरकारेच ठरवतील. 100 गुणांची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चारित्र्याविषयी अहवालासाठी प्रत्येकी 40 गुण आणि मुलाखतीसाठी 20 गुण असतील. त्यानंतरच अधिकारी आयएएस दर्जा मिळवू शकणार आहेत.
महाराष्‍ट्रात : राज्यात सध्या 8 ते 12 वर्षे नोकरी झाल्यानंतर संबंधित वरिष्ठ अधिका-यांचे ‘सीआर’ पाहून त्यांना आयएएस दर्जा दिला जातो.