आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreign Couple Rounds Domestic Customs Read English Translation Verses Mp

विदेशी दांपत्याने रचले भारतीय पद्धतीने लग्न, वाचले श्लोकांचे इंग्रजी भाषांतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदुर (मध्य प्रदेश)- तीन विदेशी दांपत्याने भारतीय पद्धतीने विवाह करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तिन्ही दांपत्य पारंपरिक भारतीय पेहरावात आले होते. यावेळी नवरदेवांनी शेरवानी आणि पगडी घातली होती. त्यावर कलगी-तुरा आणि चंदनाचे तिलक लावले होते.
नवरी मुलींनी लाल साडी नेसली होती. यावेळी त्यांच्या हातांवर मेहंदीही रचलेली होती. लग्नापूर्वी त्यांची विधिवत वरात काढण्यात आली. यावेळी उपस्थित मोठ्या उत्साहाने वरातीत सहभागी झाले. खंडवा मार्गावरील लिम्बोदी येथील परमानंद आश्रमात हा अनोखा विवाह पार पडला.
महापौर कृष्णमुरारी मोघे आणि इतर पाहुण्यांनी कन्यादान केले. दांपत्याने विधिवत सात फेरे घेतले. नवरदेवांनी नवरी मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. हार टाकले. यावेळी संस्कृतमधील श्लोकांचे इंग्रजी भाषांतर म्हणण्यात आले. हा समारंभ बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या लग्नाची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर