आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreigners Have India\'s \'Kohinoor\' And Other Things

\'कोहिनूर\'च नव्हे, भगवान विष्णुचा \'हीर्‍याचा डोळा\'ही पळवलाय ब्रिटिशांनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/लंडन- जगातील सर्वात मोठा हिरा म्हणून ज्याचा लौकिक होता तो म्हणजे 'कोहिनूर'. आज कोहिनूर हिरा भारतात परत आणण्‍याच्या मुद्द्यावरून देशात रान पेटले आहे. केंद्र सरकारने कोहिनूर हिरा मायदेशात परत आणण्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत. मात्र, कोहिनूरवर भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणने दावा केला आहे.

तुम्हाला माहीत आहे काय? कोहिनूर हिर्‍यासह धारच्या सरस्वतीच्या मूर्तीसह अनेक अमुल्य वस्तू आजही विदेशात आहेत. त्या भारतात परत आणण्यावर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे.

कोहिनूर हिर्‍याशी संबंधित महत्त्वपूर्ण फॅक्ट्‍स...
- कोहिनूर हिऱ्याला मोठा इतिहास असून तो ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्याच्या आधी पंजाबचे महाराज रणजितसिंग यांच्याकडे होता. हिर्‍याचे सध्याचे वजन 105 कॅरेट असून आजमितीला त्याची किंमत 100 दशलक्ष पौंड इतकी आहे.
- महाराज रणजितसिंग यांचे 1839 मध्ये निधन झाल्यानंतर दुलिपसिंग गादीवर आले. त्यांच्याच काळात कोहिनूर हिरा आपल्याला भेट मिळाल्याचे दाखवून ईस्ट इंडिया कंपनीने तो इंग्लंडला नेला.
- इंग्लंडच्या महाराणीच्या राजमुकुटात कोहिनूर हिरा बसवण्यात आला. हा राजमुकुट इंग्लंडच्या महाराणीच्या बकिंगहॅम राजवाड्यातील वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवण्यात आला आहे.
-कोहिनूर हिरा ब्रिटिशांनी चोरून नेला असून तो इंग्लंडने आता भारताला परत करावा या मागणीसाठी "माउंटन ऑफ लाइट' या भारतीयांनी स्थापन केलेल्या गटाने इंग्लंडच्या महाराणीवर लंडनच्या उच्च न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी चालविली आहे.
-त्यांच्या या मोहिमेला अनेक भारतीय उद्योजक तसेच बॉलीवूडमधील काही कलाकारांनीही पाठिंबा दिला आहे.
- ब्रिटिशांनी कोहिनूरच हिराच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार व असंख्य मौल्यवान वस्तू आपल्या देशात नेल्या. ही दुसरेतिसरे काही नसून भारतीय संपत्तीची लूटच होती.
- बकिंगहॅम राजवाड्यातील वस्तुसंग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार भारतात परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांनी जोरदार प्रयत्न केले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, कोहिनूरसह भारताच्या कोणत्या अमुल्य वस्तू आहेत विदेशात?