आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sambar Was Found In A Bathroom In Betul, Forest Dept Team Catch It

घराच्या बाथरुममध्ये सापडला सांभर, नऊ तासांच्या प्रयत्नानंतर काढले बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैतुल (मध्य प्रदेश)- रामनगरमधील एका घराच्या बाथरुममध्ये घुसलेल्या सांभाराला बाहेर काढताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला. हेल्मेट, जॅकेट, जाळी, फासा आदींचा उपयोग केल्यावरही सांभार बाहेर येत नव्हता. अखेर घोडा पकडणारा शेख कासिम याने सांभाराला जाळीत पकडले.
या सांभाराचे वय तीन वर्षे असल्याचे समजते. हमलापूर डेपोजवळ वकील शशिकांत नागले यांचे घर आहे. बुधवारी पहाटे हा सांभर त्यांच्या घरातील बाथरुममध्ये घुसला. त्यानंतर वन विभागाला याची माहिती देण्यात आली. वन विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांनी सांभाराला बाहेर काढण्याचा कसोशिने प्रयत्न केला. तब्बल नऊ तास ही टीम सांभाराला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत होती. त्यानंतर शेख कासिमने सांभाराजवळ जाण्याची हिंमत केली. त्याने हुशारीने त्याला जाळीत अडकवले. त्याला बाथरुमबाहेर काढले. यावेळी जाळीत अडकलेल्या सांभाराला बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
पुढील स्लाईडवर बघा, शशिकांत नागले यांच्या घराच्या बाथरुममध्ये घुसलेला सांभर... कसे काढले बाहेर...