आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मित्राने गोळी झाडून केली मित्राची हत्या, थरार कॅमेऱ्यात कैद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- येथील भिंडमध्ये काल (मंगळवार) रात्री एका रुग्णालयात लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्या झालेला आणि गोळी झाडणारा दोघेही मित्र आहेत. दोघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दोघांचे स्थानिक राजकीय नेत्यांसोबत संबंध आहेत. पोलिसांनी फरार आरोपीला पकडण्यासाठी पाच हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
वाळूच्या कारभारावरुन झाला होता वाद
पोलिसांनी सांगितले, की विमलेश, संजू, धर्मेंद्र आणि मोनी तोमर मित्र आहेत. हे चारही जण हिस्ट्रीशिटर आहेत. काल रात्री चौघे दारु घेत होते. यावेळी वाळूच्या कारभारातील 40 लाखांच्या व्यवहारावर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सगळे आपापल्या घरी गेले. त्यानंतर विमलेश संजूच्या घरी गेला. त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर संजूला भिंडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जरा वेळात विमलेश तेथे आला. संजू जीवंत आहे का, याची खातरजमा करण्यासाठी विमलेश गेला होता. विमलेश रुग्णालयात गेला तेव्हा धर्मेंद्रने त्याच्यावर बंदुक रोखून धरली. बंदूक बघून विमलेश घाबरला. रुग्णालयातील प्रसुतीगृहात घुसला. परंतु, धर्मेंद्रने त्याचा पाठलाग केला. त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. विमलेशचा जागीच मृत्यू झाला. तेव्हापासून धर्मेंद्र फरार आहे. संजुवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचा अंगावर काटा उभा करणारा व्हिडिओ.... आणि फोटो....