आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : मध्य प्रदेशच्या आमदारांना त्यांच्या सहका-यांनी दिल्या \'नोबेल\' शुभेच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - मध्य प्रदेशचे मंत्री कैलश विजयवर्गिय आणि नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी )
इंदूर - नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या कैलाश सत्यार्थी यांना अवघे जग ओळखायला लागले आहेत. पण त्यांच्याच राज्यातील आमदार आणि मंत्र्यांना त्यांची ओळख नसल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या आमदारांना ज्यावेळी विचारण्यात आले त्यावेळी चक्क त्यांनी कैलाश सत्यर्थी यांचे नाव घेण्याऐवजी नोबेल पुरस्कार मंत्री कैलाश विजयवर्गीय यांना मिळाल्याचे सांगितले. कैलाश विजवर्गिय हे मध्यप्रदेश सरकारचे मंत्री आहेत.
त्याचे झाले असे की, कैलाश सत्यार्थी एमपीमधील विदिशा या गावातील रहिवासी असल्याने येथील स्थानिक पत्रकारांनी मध्यप्रदेशच्या आमदार आणि मंत्र्यांना कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हे अजब-गजब उत्तरे ऐकण्यास मिळाली. हे ऐकल्यानंतर पत्रकांनादेखील त्यांचे हसू आवरले जात नव्हते.

पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर कैलाश हे नाव ऐकताच या नेते मंडळींनी मध्यप्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांना शुभेच्छा देखील देवून टाकल्या. तर काही जणांनी याला केंद्रात भाजप आणि मध्य प्रदेशात देखील भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे फायदा झाल्याचे स्पष्ट केले हे आश्चर्य.
पुढील स्लाइडबर क्लिक करून वाचा, मध्य प्रदेशच्या आमदारांच्या शुभेच्छा...
व्हिडिओ सौजन्य - ABP माझा