आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2000 रुपयाच्‍या नोटेवरुन गांधी गायब, SBI ने परत घेतली नोट; शेतकरी त्रस्‍त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्‍वाल्‍हेर येथील SBI बँक शाखेने शेतकऱ्यांना दिलेल्‍या बिना गांधींच्‍या दोन हजाराच्‍या नोटा. - Divya Marathi
ग्‍वाल्‍हेर येथील SBI बँक शाखेने शेतकऱ्यांना दिलेल्‍या बिना गांधींच्‍या दोन हजाराच्‍या नोटा.
ग्वाल्‍हेर - नोटबंदीमुळे जनतेला दररोज नवनविन अडचणींचा त्रास सोसावा लागत आहे. पन्‍नास दिवस संपूनही नोटांचे विघ्‍न मात्र संपत नाहीए. मध्‍यप्रदेशातील ग्‍वाल्‍हेर शहरात एका एसबीआय बँक शाखेमध्‍ये पैसे काढायला गेलेल्‍या दोन शेतकऱ्यांना नोटा तर मिळाल्‍या, मात्र त्‍यावर गांधीजींचे चित्रच नव्‍हते. ही बा‍ब शेतकऱ्यांच्‍या लक्षात आल्‍यावर नोटा बदलण्‍यासाठी त्‍यांना तासभर भटकावे लागले.  
जाणुन घ्‍या काय आहे प्रकरण  
 
- मध्‍यप्रदेशमधील ग्‍वाल्‍हेर शहरात SBI बँक शाखेमध्‍ये ही घटना घडली आहे. 
- गुरमीत सिंह आणि लक्ष्‍मण सिंह हे दोन शेतकरी पैसे काढण्‍यासाठी बँकेत गेले होते. 
- गुरमती सिंहने 2 हजाराच्‍या 4 तर लक्ष्‍मण सिंहने 3 नोटा काढल्‍या. 
- मात्र या नोटांवर गांधीजींचे फोटोच नव्‍हते. 
- ही बाब दोन्‍ही शेतकऱ्यांना बँकेच्‍या बाहेर आल्‍यावर लक्षात आली. 
- नोटा बदलण्‍यासाठी हे शेतकरी परत बँकेत पोहोचले. मात्र तेथे त्‍यांना किमान तासभर ताटकळत राहावे लागले. 
- बँक अधिकाऱ्याकडे तक्रार केल्‍यानंतर त्‍यांना नोटा बदलून मिळाल्‍या.
 
गांधीजींचे फोटो का नाही?
- बँक मॅनेजरने सांगितले की, श्‍योपूर येथे असणाऱ्या एसबीआयच्‍या मुख्‍य शाखेकडून बँकेला नूकतेच 49लाख रुपये मिळाले आहे. यातील काही नोटांवर गांधीजींचे छायाचित्र नाही.
- त्‍यांनी सांगितले की, या नोटांना जप्‍त करण्‍यात आले असून ग्राहकांना नोटा बदलून दिल्‍या जात आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)  
 
बातम्या आणखी आहेत...