आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात महिलेवर गॅंगरेप; आरोपींमध्ये भाजपचा नगरसेवक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दातिया- मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील दंग करेरा गावातील एका 22 वर्षीय महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. उल्लेखनीय म्हणजे बलात्कार करणार्‍या आरोपींमध्ये दातिया नगरपरिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नगरसेवकाचा समावेश आहे.
पीडित महिला आपल्या दिरासोबत शेरशा येथून दंग करेरा गावात येत असताना पाच जणांनी त्यांना वाटेतच अडवले. शस्त्राचा धाक दाखवून तिच्या दिराला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या देखतच पाचही नराधमांनी तिच्यावर आळीपाळीत बलात्कार केला.

याप्रकरणी दातिया पोलिसांत गुन्हा दाखल करण्‍यात आला असून पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. पाचही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.