आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसह 8 जणांवर बलात्काराचा आरोप, मृत समजून पोत्यात बांधून रस्त्याच्या कडेला फेकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - मध्य प्रदेशातील देवास येथील एका महिलेने पतीसह 8 जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे. महिला इंदूर रोडवर जखमी अवस्थेत एका पोत्यात बांधलेली होती, पोत्यात हलचाल होत असल्याचे पोहून पोलिसांनी तिला बाहेर काढले. बुधवारी सकाळी केलेल्या चौकशीत तिच्यावर गँगरेप झाल्याचे समोर आले.
पोलिस काय म्हणाले
देवास येथील पोलिस अधीक्षक शशिकांत शुक्ला म्हणाले, महिला उज्जैनच्या नागझिरी रोड येथील रहिवासी आहे. तिचा पती पप्पू जयसवालसोबत वाद सुरु आहे. त्यांचा सिहोर कोर्टात खटला सुरु आहे. दोन वर्षांपासून दोघे वेगळे राहातात. 25 जानेवारी रोजी सुनावणी झाल्यानंतर महिला उज्जैनला जाण्यासाठी देवास बस स्टँडवर आली होती. येथून तिच्या पतीने तिचे अपहरण केले.

तक्रार मागे घेण्यासाठी पतीचा दबाव
देवास बस स्टँडवरुन तिला बोलेरो गाडीतून पळवून नेण्यात आले. महिलेने सांगितल्यानुसार, आरोपी पप्पू जयसवाल तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे तिच्या दीरासह आठजण होते. पती, दीर आणि इतरांनी तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला, मात्र तिने नकार दिल्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर चाकूने वार करण्यात आले. मेलेली समजून तिला एका पोत्यात बांधले आणि रस्त्याच्या कडेला फेकून दिले.

आरोपींचा शोध सुरु
एसपी शुक्ला म्हणाले, महिलेच्या जबाबानुसार, देवास पोलिसांनी पती, दीर आणि आठ जणांविरोधात बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.