आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेशनवर ट्रेनची वाट पाहाणाऱ्या 21 वर्षीय महिलेला फूस लावून आणले घरी, केला गँगरेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्यप्रदेशातील एका रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहात असलेल्या 21 वर्षीय महिलेवर गँगरेप झाल्याचे समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार, महिला तिच्या लहान मुलीसोबत ट्रेनची वाट पाहात होती. त्याचवेळी स्टेशनवर चार जण आले आणि त्यांनी महिलेला फूस लावून सोबत घेऊन गेले. त्या लोकांनी महिलेला स्वतःच्या घरी नेऊन गुंगीचे औषध देऊन गँगरेप केला.
नोकरी देण्याच्या बहाण्याने नेले घरी, अटकेनंतर झाला खुलासा
- अशी माहिती आहे की आरोपींनी महिला एकटी असल्याचा फायदा उचलत तिची मजबूरी जाणून घेतली. तिला नोकरीचे अमिष देऊन भोपाळमधील निशातपूरा येथील बृज कॉलनीमधील स्वतःच्या घरी घेऊन गेले. त्यावेळी तिच्यासोबत तिची लहान मुलगीही होती.
- चार आरोपींमध्ये दोघे नात्याने मेव्हणा आणि भावजी आहेत.
- महिलेला घरी आणून आरोपींनी तिला जेवणातून गुंगीचे औषध दिले. बेशुद्धीच्या आवस्थेत महिलेवर गँगरेप करण्यात आला.
- सकाळी जेव्हा दोन आरोपी महिलेला स्टेशनवर सोडायला निघाले तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.
- या प्रकरणी पोलिसांनी गँगरेप आणि जीवे मारण्याचा प्रयत्न या आरोपांखाली त्यांना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.
- पोलिसांनी सांगितले की महिला दुसऱ्या राज्यातील आहे. तिला पतीने सोडून दिले होते.
- काही दिवसांपासून ती भोपाळमधील एका हॉटेलमध्ये आपल्या लहानगीला घेऊन राहात होती.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समध्ये वाचा पूर्ण प्रकरण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...