आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्जैनमध्ये गॅंगवॉर, 25 वर्षांच्या शत्रुत्वाने घेतला दोघांचा जीव, आतापर्यंत 11 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळावरुन पोलिसांनी 12 बोअरची बंदूक जप्त केली. लाला त्रिपाठीने एका घरात लपण्याचा प्रयत्न केला. पण गुडांनी घरात घुसून त्याची हत्या केली. - Divya Marathi
घटनास्थळावरुन पोलिसांनी 12 बोअरची बंदूक जप्त केली. लाला त्रिपाठीने एका घरात लपण्याचा प्रयत्न केला. पण गुडांनी घरात घुसून त्याची हत्या केली.
उज्जैन (मध्य प्रदेश)- येथील रामघाट परिसरात काल रात्री 9 च्या सुमारास दोन गटांमध्ये जोरदार गोळीबार झाला. यात शहरातील कुख्यात गुंड विश्वास उर्फ लाला त्रिपाठी आणि त्याच्या गॅंगमधील रवी पचौरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा गोळीबार 2008 मध्ये झालेल्या नन्नू गुरु हत्याकांडाशी संबंधित आहे. लालाने नन्नू गुरुची हत्या केली होती. त्याचा बदला काल घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पोलिस आयुक्त एम. एस. वर्मा यांनी सांगितले, की लाला त्रिपाठी इतर गुंडांसह शगुन गार्डन येथून परत येत होता. यावेळी योगमाता मंदिराजवळ नन्नू गुरु गॅंगचे काही गुंड लपून बसले होते. त्यांनी लाला आणि त्यांच्या गुडांवर जवळून गोळीबार केला. त्यानंतर लालाच्या गुंडांनीही गोळीबाराला गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. यात लाला आणि रवी जागीच ठार झाले. बबलू निगम आणि उमेश शुक्ला जखमी झाले. नन्नू गुरु गॅंगचे अजय अवाड आणि आशीष दुबे हेही जखमी झाले आहेत.
गेल्या 25 वर्षांपासून 11 हत्या
- 1989 मध्ये गुदरी चौकात भुरा पहिलवान याची हत्या करण्यात आली होती. त्याचा आरोप अखिलेश व्यास यांच्यावर लावण्यात आला होता. पण या हत्या प्रकरणात त्यांची सुटका झाली.
- लाला त्रिपाठी व्यास यांचा गुंड होता. पण 1995 मध्ये व्यासची तीन गुंडांसह धरमबडला परिसरात हत्या झाली होती.
- व्यासच्या हत्येचा आरोप सुगनबाईवर लागला. लाला त्रिपाठीने याचा बदला घेण्यासाठी सुगनबाईच्या तीन मुलांची हत्या केली.
- या दरम्यान लालाच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. त्यामुळे आधी धर्मेंद्र चौरसिया आणि नंतर नन्नू गुरु गॅंगमधून बाहेर पडले.
- 2008 मध्ये त्याने नन्नू गुरुची हत्या केली. गॅंगमध्ये आपले वर्चस्व राहावे यासाठी त्याने ही हत्या केली होती.
पुढील स्लाईडवर बघा, उज्जैनमध्ये झालेल्या गॅंगवॉरमध्ये जखमी झालेले गुंड....