भोपाळ - पियो ऐसा जिया में समाय गयो रे, गरबा मा धूम मची जाय, चल बेटा सेल्फी ले ले, देसी गर्ल... अशा गाण्यांवर युवक-युवतींचा उत्साह दररोज रात्री उत्तरोत्तर वाढत जात आहे. भोपाळमधील अभिव्यक्ती गरबा महोत्सवात भक्ती गीतांसोबत चित्रपट गीतांची सध्या धूम सुरु आहे.
गाण्याच्या तालावर ठेका धरत तरुणी बेधुंद होऊन गरबा आणि दांडिया खेळत आहेत. यात लहान मुलेही मागे नाहीत. रोजच्या धकाधकीचा ताण-तणाव विसरून सर्वच गरब्याच्या मस्तीत तल्लीन होत आहेत. अभिव्यक्ती गरबाचा शुक्रवारी दुसरा दिवस होता, 19 ऑक्टोबर पर्यंत हा महोत्सव सुरु राहाणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बेधूंद तरुणाईच्या गरब्यातील विविध छटा