आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gauraksha Samiti Members Assaulted Muslim Couple In MP

MP: बीफच्या संशयावरुन मुस्लिम जोडप्याला मारहाण, सामानाची झडती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरदा स्टेशनवर संशयामुळे मारहाणीचे शिकार झालेले हुसैन. - Divya Marathi
हरदा स्टेशनवर संशयामुळे मारहाणीचे शिकार झालेले हुसैन.
भोपाळ - हरदा रेल्वे स्टेशनवर काही जणांनी मुस्लिम कुटुंबाच्या सामानाची झडती घेण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम दाम्पत्याने याला विरोध केल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींना शंका होती की मुस्लिम दाम्पत्याच्या बॅगमध्ये बीफ आहे.

कोण होते मारहाण करणारे
इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सामानाची झडती घेणारे आणि दाम्पत्याला मारहाण करणारे सहा लोक होते, ते गौरक्षा समितीचे सदस्य होते. पोलिसांनी बुधवारी या घटनेला दुजोरा दिला आहे.

काय आहे प्रकरण
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरक्षा समितीच्या सदस्यांना माहिती मिळाली होती, की कुशीनगर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबाकडे बीफ आहे.
- खिरकिया स्टेशनवर समितीचे काही लोक जनरल बोगीत चढले त्यांनी मुस्लिम जोडप्याच्या सामानाची झडती घेण्याचा प्रयत्न केला असता मुस्लिम जोडप्याने त्यांना विरोध केला, म्हणून गौरक्षा समितीच्या लोकांनी त्यांना मारहाण केली.
- पोलिसांच्या माहितीनुसार, लॅब टेस्टमध्ये सिद्ध झाले की ते म्हशीचे मांस होते. गोरक्षा समितीच्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे, त्यांचे नाव हेमंत राजपूत आणि संतोष आहे.
- भांडण केल्याच्या आरोपात जोडप्याच्या नातेवाईकांसह नऊ जणांना अटक करण्यात आली, या सर्वांना नंतर जामीनावर सोडून देण्यात आले.

दाम्पत्य काय म्हणाले
- हैदराबादहून हरदा येथे परतणाऱ्या मोहम्मद हुसैन यांनी सांगितले, 'आरोपींनी आमच्या सामानाची झडती घेण्याचा प्रयत्न केला, माझ्या पत्नीने त्यांना विरोध केला.'
- हुसैन म्हणाले, 'आम्ही भारतात राहातो आणि आम्हाला माहित आहे, काय योग्य आणि काय अयोग्य आहे. आम्ही केवळ बकऱ्याचे मटण खातो. ज्या बॅगमध्ये ते मीट होते, ती आमची नव्हती. पोलिसांनी माझ्या पत्नीला त्यांच्या तावडीतून वाचवले.'
- हुसैन म्हणाले, 'माझ्या पत्नीसोबत असभ्य वर्तन करण्यात आले, मला मारहाण करण्यात आली. ही घटना समोर आल्यानंतर या जोडप्याला खंडवा येथे एका नातेवाईकाच्या घरी रात्र काढावी लागली.'
पोलिस काय म्हणाले
- खिरकिया पोलिस स्टेशनेचे एएसआय के रिछारिया म्हणाले, स्थानिक प्रयोगशाळेत बॅगमधील मांसाची तपासणी करण्यात आली, त्यात ते म्हशीचे मांस असल्याचे आढळून आले आहे .
- इटारसीचे आरपीएफ अधिकारी डी.के.जोशी म्हणाले, हेमंत आणि संतोषला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. इतरांचा शोध सुर आहे.
- हरदाचे आमदार रामकिशोर डोंगरे म्हणाले, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या दबावात पोलिसांनी जोडप्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला जोडप्याला त्रास देण्यात आला आणि नंतर त्यांच्याच नातेवाईंकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील स्लाइडमध्ये, काय आहे गोमांस मुद्दा