आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • General Election 2014: In Vidisha, Sushma Swaraj Does Not Mention Modi In Election Campaign

सुषमा स्वराज यांच्या प्रचारातून गायब आहेत मोदी व त्यांचे मिशन 272+

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज व पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यात अंतर्गत छुपा संघर्ष असल्याचे अनेकवेळा पुढे आले आहे. आता मध्य प्रदेशात आणि स्वराज यांच्या विदिशा या लोकसभा मतदारसंघात त्याची छलक पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशात व या मतदारसंघात ना कोठे नरेंद्र मोदींची लहर दिसत आहे ना मोदींचे मिशन 272+ हा संकल्प. सुषमा स्वराज आपल्या प्रचारसभात ना मोदींबाबत बोलतात ना मिशन 272+. असे असले तरी स्वराज मिशन 29 नुसार काम करीत आहेत. ते मिशन 29 म्हणजे मध्य प्रदेशातील सर्वच्या सर्व 29 जागा जिंकण्याचे व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे स्थान बळकट करण्याचे.
विदिशात पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुषमा म्हणतात, की मी येथे काही राजकीय भाषणे व धडे देण्यासाठी आले नाही. निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याला दोन गोष्टीची गरज असते. पहिली गोष्ट म्हणजे पक्षासाठी चांगले वातावरण करणे आणि दुसरे म्हणजे बूथ स्तरावर संघटना पातळीवर काम करणे. या दोन बाबी काटेकोरपणे पाळल्या तर आपला विजय कोणीही रोखू शकत नाही. याचबरोबर पक्ष कार्यकर्त्यांना त्या आव्हान करतात मी 2009 मध्ये मला मिळालेले 3.89 आता 4 लाखांच्या वर गेले पाहिजे.
पुढे वाचा, विदिशात मोदींचे नव्हे स्वराज यांचेच स्लोगन...