आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Germany Girls Taking Care Of Orphan Childrens News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO: अनाथ मुलांची सेवा करण्‍यासाठी जर्मनीहून भारतात आल्या या चौघी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- पहाटे साडेपाचला उठणे, मुलांना अंघोळ घालणे. त्यांना न्याहारी देऊन शाळेत पाठवणे. नंतर त्यांच्यासाठी दुपारचे जेवण तयार करणे. मग सायंकाळी त्यांच्यासोबत मैदानी आणि मनोरंजनाचे खेळ खेळणे. रात्रीच्या जेवणाची तयारी करणे, हे झाले भारतीय गृहिणीचे रूटीन. परंतु सध्या हेच रुटीन जर्मनीतील चार तरुणी अनुभवताना दिसत आहेत.
मध्यप्रदेशातील भोपाळपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळनेर येथील नित्य सेवा संस्थेत या चौघी माहील काही दिवसांपासून राहात आहेत. चौघी तरुणी 12वी उत्तीर्ण असून आश्रमातील 200 अनाथ मुलांची सेवा करत आहेत. कोजिमा, किन, ख्रिस्टिनन आणि ग्यार्डा, अशी चौघींची नावे असून 'कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम'च्या माध्यमातून त्या भारतात आल्या आहेत.

नित्य सेवा संस्थेत दोन वर्षांपासून किशोरावस्थेतील अनाथ मुले राहतात. चौघी तरुणी मुलांची उत्तम प्रकारे व्यवस्था ठेवतात. आता तर चौघांनी स्वयंपाक करता येतो. पोळ्या लाटता येतात. तीन आठवड्यांपूर्वी आलेल्या कोजिमा सां‍गितले की, सुरुवातीला खूप अडचणी आल्या. परंतु आता सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आहे. मुलांमध्ये वेळ घालवणे, त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्यातून खूप आनंद मिळतो. ख्रिस्टिनन आणि किमला मुलांसोबत खेळणे आवडते. नित्य सेवा संस्थेतील हा अनुभव कॅरियरसाठी खूप फायदेशीर ठरणार असल्याचेही चौघांनी सांगितले.
चौघी आपापसात आपल्या भाषेत संवाद साधतात. तसेच त्यांना इंग्रजीही बोलता येते. विशेष म्हणजे मुलांशी बोलताना त्या हिंदीमधील काही शब्दांचाही वापर करतात. हिंदी भाषा संस्थेतील काही मुलांकडून शिकून घेतल्याचे किम सांगितले. तसेच तिने मुलांना इंग्रजी भाषा शिकवली. स्वदेशी परतल्यानंतर या चौघी यूनिव्हर्सिटीत प्रवेश घेणार आहेत.

दरवर्षी येतात जर्मन विद्यार्थी...
नित्य सेवा संस्थेच्या संयोजिका नम्रता निगम यांनी सांगितले की, दरवर्षी जर्मनीहून काही विद्यार्थी येथे येतात. स्वयंसेवक म्हणून ते संस्थेत सेवा देतात. संस्थेतील मुलांसोबत ते तीन महिने राहतात. नित्य सेवा संस्थेचे संस्थेचे संचालक आणि मध्य प्रदेशाच्या पहिली महिला आयपीएस आशा गोपाल यांच्या मार्फत स्वयंसेवकांची निवड केली जाते.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, सेवाश्रमातील मुलांची सेवा करताना जर्मनीतील विद्यार्थिनी...

(फोटो: मध्य प्रदेशातील पिंपळनेर नित्य सेवा संस्थेच्या मेसमध्ये पोळ्या लाटताना जर्मन स्टूडेंट्स)