आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या एसएमएसवर मिळणार औषधे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - टेलिमेडिसिन कॉल सेंटरच्या माध्यमातून डॉक्टरांनी रुग्णांना एसएमएसवर फॉरवर्ड केलेले औषधांचे प्रिस्क्रीप्शनही यापुढे मेडिकल दुकानांमध्ये ग्राह्य धरले जाणार आहे. यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाला एमसीआयमध्ये (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया) सहमती झाली आहे. संसद अधिवेशनाच्या आगामी सत्रात त्यासंदर्भातील कायद्याला मान्यता मिळण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर नवा बदल देशभर लागू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रुग्ण त्यांना डॉक्टरांनी एसएमएसवर पाठवलेले प्रिस्क्रीप्शन औषध दुकानदारांना दाखवून औषधे घेऊ शकतील.
सध्या केवळ डॉक्टरांनी लेखी स्वरूपात दिलेल्या प्रिस्क्रिप्शनलाच एमसीआयची मान्यता आहे. भोपाळ येथील एम्सचे असोसिएट्स प्रोफेसर डॉ. सूर्या बाली यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. टेलीमेडिसिनला प्रोत्साहन देण्यासाठी ही सुविधा सुरू केली जाणार आहे. टेलिमेडिसन कॉल सेंटरवर रुग्णाने फोन केल्यास तेथील डॉक्टर त्यांना एसएमएसवर औषधांची नावे पाठवतील. मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत ही योजना सुरू आहे.