आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संस्था अध्यक्षांकडून शिक्षिकेचे तब्बल 15 वर्षे लैंगिक शोषण; पीडितेचा आत्महत्येचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- मध्य प्रदेशातील एका शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षाकडून लैंगिक शोषणाची शिकार झालेली एक शिक्षिका न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. पोलिस तिची एफआयआर दाखल करून घेत नसल्याने तिने आत्महत्या करण्याचा इशाराही दिला आहे.

गिरिश वर्मा हे प्रतिष्ठीत नागरिक असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून घेण्यास पोलिस टाळाटाळ करत आहे. वर्मांच्या विरोधात तक्रार न दाखल झाल्यास मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा इशाराही या महिलेने दिला आहे.

पीडित शिक्षिकेला रविवारी महिला पोलिस ठाण्यात वर्माविरुद्ध एफआयआर दाखल करण्‍यासाठी बोलावले होते. एसआय सीमा पटेल यांनी सर्व कागदपत्रेही तयार केली होती. परंतु एक फोन आला आणि एफआयआर दाखल करून घेण्‍यास सीमा पटेल यांनी नकार दिला.

पीडित शिक्षिकेने पत्रकार परिषदेत सांगितले की, गिरिश वर्मा याने तिच्या कुटूंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तो सन 1998 पासून आपले लैंगिक शोषण करत होता. वर्मा यांनी आपले आक्षेपार्ह छायाचित्रेही काढली असून ते इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी देत आहे.