आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girl Free Form Jail After 72 Days In Khandwa Madhya Pradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाहक शिक्षा भोगणार्‍या बालिकेची ७२ दिवसांच्या तुरुंगवासानंतर सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खांडवा - फसवणूक प्रकरणातील आरोपी महिलेच्या खोटारडेपणामुळे तिच्याच भाचीला तब्बल ७२ दिवस तुरुंगात काढावे लागले. मध्य प्रदेशच्या विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. गंगाचरण दुबे निरीक्षणासाठी तुरुंगात गेल्यानंतर बालिका त्यांना बिलगून रडायला लागली आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर न्यायाधीशांनी तत्काळ आदेश देत तिची सुटका केली.

बालिकेचे नाव कृष्णा असून आरोपी महिलेच्या बहिणीचीच मुलगी आहे. प्राप्त माहितीनुसार, झाबुआ जिल्ह्यातील मिसराबाईला एका फसवणुकीच्या प्रकरणात दोन वर्षांचा कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या प्रकरणाची सुनावणी ज्या दिवशी होती तेव्हा आरोपीची बहीण आणि पती त्यांच्या मुलांसोबत न्यायालयात आले होते. दरम्यान, बहिणीच्या मुलीलाच आपली मुलगी असल्याचे न्यायालयात सांगितल्यास न्यायाधीश त्याप्रति संवेदना दाखवत कमी शिक्षा सुनावतील, असा सल्ला आरोपी महिलेस कुणीतरी दिला होता. त्यामुळे मिसराबाईने बहिणीच्याच मुलीला आपली मुलगी असल्याचे न्यायालयात सांगून दिले. मात्र, न्यायाधीशांनी त्यापूर्वीच निकाल दिलेला होता. दरम्यान, पोलिसांनी मावशीसोबत कृष्णालाही तुरुंगात टाकले.

निरागस कृष्णा न्यायाधीशांना बिलगली : शनिवारी सायंकाळी न्या. दुबे तुरुंगाच्या मासिक निरीक्षणासाठी अचानक पोहोचले. तेव्हा कृष्णा थेट त्यांनाच येऊन बिलगली आणि मोठ्याने रडायला लागली. न्या. दुबेंनी तिला तिच्या आईविषयी विचारणा केली. तेव्हा अन्य कैद्यांनी सांगितले की, ती आईसोबत नव्हे तर तिच्या मावशीसोबत तुरुंगात आहे. हे कळताच न्या. दुबे यांनी जिल्हा न्यायाधीश अभिनंदन कुमार जैन यांना फोनवरून ही माहिती कळवली.

न्या. जैन यांनी तत्काळ तिची सुटका करण्याचे आदेश दिले. सध्या कृष्णा बालसुधारगृहात असून तिच्या कुटुंबीयांना सुटकेची माहिती देण्यात आली आहे. लवकरच तिला त्यांच्या हवाली करण्यात येईल.

लिपिकाचा बेजबाबदारपणा
तुरुंग वॉरंट बनवताना न्यायालयीन लिपिक युधिष्ठिर वर्मा यांच्या चुकीमुळे बालिकेला शिक्षा भोगावी लागली. आरोपीसोबत ७ वर्षांची मुलगी असल्याने वर्मा यांनी वॉरंटवर लाल शाईत लिहून टाकले. तिच्याशी संबंधित कागदपत्रे तपासण्याचीही त्यांनी तसदी घेतली नाही. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी लिपिकाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.