आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Raped By Beauty Parlor Owner And Make Video

ब्यूटी पार्लरमध्ये बलात्कार करुन बनवला अश्लिल व्हिडिओ, पत्नीने दिली पतीला साथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी बंटी वर्मा आणि त्याची पत्नी रिंकू वर्मा. - Divya Marathi
आरोपी बंटी वर्मा आणि त्याची पत्नी रिंकू वर्मा.
इंदूर - ब्यूटी पार्लरमध्ये आलेल्या मुलीचा अश्लिल व्हिडिओ तयार करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी ब्यूटी पार्लर मालकासह पाच जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये ब्यूटी पार्लर मालकाच्या पत्नीचाही समावेश आहे. अश्लिल व्हिडिओ तयार करण्यात तिने पतीला साथ दिली होती. बलात्कारानंतर युवतीला मानसिक धक्का बसला होता, तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानतंर कुटुंबीयांना तिच्यावर झालेल्या अत्याचाराची घटना कळाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, इंदूरच्या सीजर आर्ट ब्यूटी पार्लरमध्ये ही घटना घडली होती. या युनिसेक्स पार्लरचे मालक बंटी आणि त्याची पत्नी रिंकू वर्मा आहेत. या दोघांवार १९ वर्षीय युवतीच्या लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. युवतीने दिलल्या फिर्यादीनूसार, आर्थिक अडचणीमुळे तिने सात महिन्यांपूर्वी पार्लरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. दोन महिन्यांपूर्वी बंटीने ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकून तिला पिण्यास दिले आणि अश्लिल व्हिडिओ शूट केला. त्यांनतर पार्लर मालक पती-पत्नी तिला ब्लॅकमेल करत होते. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बंटीने बलात्कार केला आणि जेंट्स पार्लरमध्ये काम करण्याचा दबाव टाकत होता. युवतीने नकार दिला तेव्हा तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
रिंकू आणि बंटी वर्मा यांच्या धमकीने त्रस्त झालेल्या युवतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन कारण विचारले तेव्हा तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची कहाणी तिने कथन केली. त्यानंतर कुटुंबीयांसह पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली आणि दोघांविरोधात तक्रार दाखल केली.
रिंकूचा भाऊ आणि भाऊजीही अटक
आरोपी पती-पत्नींसह रिंकूचा भाऊ सूरज, भाऊजी लोकेंद्र आणि पार्लरमधील नोकर राजू यांनी देखील गुन्ह्यात साथ दिली. त्यांच्यावरही वेगळ्या कलमांनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आयटी अॅक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.