आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रॅगिंगने त्रस्त झालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिकणा-या विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी भोपाळमध्ये घडली. अनिता शर्मा (18) असे तीचे नाव आहे. घटनेच्या वेळी घरात फक्त तिची सात वर्षांची भाची होती.


मृतदेहाजवळ मिळालेल्या चिठ्ठीमध्ये तीने महाविद्यालयाच्या चार वरिष्ठ विद्यार्थिनींवर रॅगिंग केल्याचा आरोप लावला आहे. आत्महत्येपूर्वी तीने भावालाही याबद्दल सांगितले होते. आरकेडीएफ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असणारी अनिता वडिलांबरोबर राहत होती. तिचे वडील मुंबईमध्ये एका खासगी कंपनीत कामाला होते. अनिताने मंगळवारी दुपारी भावाला महाविद्यालयात वरिष्ठ विद्यार्थिनी रॅगिंग करत असल्याची तक्रार केली. नंतर अनिल संध्याकाळी सहा वाजता भाजी घेण्यासाठी गेला त्यावेळी अनिताने फाशी लावून आत्महत्या केली.
शेवटची इच्छा, गुलाबी ड्रेस : मी घाणेरडीही बनू शकत नाही
आणि स्ट्राँगही नाही. मला अंत्यसंस्कारासाठी गुलाबी ड्रेस घाला...’ अशा शब्दांत अनिताने शेवटची इच्छा व्यक्त केली होती.
...त्यांना शिक्षा जरूर व्हावी
...मी जेव्हापासून कॉलेजमध्ये आले तेव्हापासून या चार मुली मला त्रास देत आहेत. त्या फार घाणेरड्या आहेत. मी एक वर्ष कसे सहन केले मलाच माहिती आहे. त्या मला चेह-यावर अ‍ॅसिड ओतण्याची व अत्याचारीची धमकी देतात. म्हणून मी आत्महत्या करत आहे. त्या माझ्याप्रमाणेच इतरांनाही त्रास देतील. त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. (चिठ्ठीतील संक्षिप्त मजकूर)