आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Girl Used To Call Her More Than 200 Times In A Day, Boy Committed Suicide, Indore News

प्रेयसीने रात्री प्रियकराला केले 351 मिस्ड कॉल; वाचा, नंतर त्याने काय केले?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- खोटं प्रेम, पैसा व विश्वासघाताने एका युवकाचा बळी घेतला आहे. मुसाखेडी भागातील न्यू इंदिरा एकता नगरात 23 वर्षीय हितेश पवारने प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हितेशचे वडील बालमुकुंद पवार यांचा सांची दूधाचा व्यवसाय आहे. हितेशच हा व्यवसाय सांभाळत होता.

मिळालेली माहिती अशी की, हितेश प्रेयसीला कंटाळला होता. मुसाखेडी भागातील पूजा नामक तरुणीच्या प्रेमजाळ्यात हितेश अडकला होता. 'फेसबुक'च्या माध्यमातून या तरुणीने हितेशशी जवळीकता वाढवली होती. नंतर ती त्याला ब्लॅकमेल करत होती. दिवसभरात त्याला 200-300 कॉल करून त्रास देत होती. हितेशने आत्महत्या केली, त्या रात्री पूजाने हितेश 351 मिस्ड कॉल केले होते. प्रेयसीच्या जाचाला कंटाळून हितेशने मोबाइल फोडून गळफास लावून आत्महत्या केली.

FB वर बनवले होते जॉइंट​ अकाउंट...
हितेशच्या आई-वडिलांनी सांगितले की, हितेशला एका तरुणीने आपल्या जाळ्यात अडकवले होते. सहा महिन्यांपूर्वी तिने हितेशला एका खोट्या आरोपातही अडकवले होते. तरुणी कॉल सेंटरमध्ये जॉब करते. तिने हितेशच्या नावाने एक जॉइंट फेसबुक आयडी देखील बनवला होता. तरूणीने स्वत:च्या हात ब्लेडने कापून फोटो हितेशच्या अकाउंटवर शेअर केले होते.

सेटलमेंटसाठी मागितले होते दीड लाख रुपये...
हितेशला तरुणीने तुरुंगात पाठवले होते. हितेशची जामिनावर सुटका झाली होती. केसमध्ये सेटलमेंट करण्‍यासाठी तिने दीड लाख रुपये मागितले होते. हितेशने तरुणीला पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला होते. तेव्हापासून ती त्याला मिस्ड कॉल करून मानसिक त्रास देत असल्याचे हितेशच्या आई-वडिलांनी सांगितले.

पूजाच्या घराला कुलूप...
घटनेनंतर पोलिस चौकशीसाठी पूजाच्या घरी पोहोचले. पण तिच्या घराला कुलूप होते. पूजा आई-वडीलसोबत फरार झाली आहे. पोलिस सगळ्यांचा शोध घेत आहेत. हितेशचे दीड वर्षापूर्वी बडवाहमध्ये साखरपूडा झाला होता. मात्र, पूजामुळे हितेशचे लग्न मोडले होते.

चौकशीनंतर करणार कारवाई...
हितेशच्या आत्महत्येची पोलिस चौकशी करत आहे. हितेश व पूजाच्या मोबाइलचे रेकॉर्ड तपासले जात आहेत. पूजा दोषी आढळल्यास तिच्यावर कारवाई करण्‍यात येईल, असे आझाद नगर पोलिस पोलिस नि‍रीक्षक के.एल. दांगी यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...