आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Global Investors Summit Day 2 Indore News Madhya Pradesh

देशाची खरी ताकद राज्यांमध्येच , पंतप्रधानांच्या हस्ते \'ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट\'चे उद्‍घाटन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः ग्लोबर इन्व्हेंर्स समिटमध्ये पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह)
इंदूर- देशाची खरी ताकद राज्यांमध्ये आहेत. जो राज्याची ताकत समजतो तोच देशाला शक्तीशाली बनवू शकतो. सर्व राज्यांनी एकत्र येऊन देशाला विकासाठी योगदान द्यावे, तसेच केंद्र आणि राज्य एक दुसर्‍यांचे पूरक असून दोघांमध्ये छत्तीसचा आकडा नसावा. देशाचा विकास झाला नाही तर पर्चेसिंग पॉवर खुंटेल, अस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) मध्यप्रदेश 'ग्लोबल इन्हेस्टर्स समिट-2014'चे औपचारिक उद्घाटन केले. आज समिटचा दुसरा दिवस आहे.
राज्यात गुंतवणूक केल्याने राज्यातील लोकांची क्रयशक्ती वाढेल. यात देशाचाच फायदा आहे. त्यामुळे देशाला पुढे आणायचे असेल तर आधी राज्यांनी पुढे याययला हवे, असे मत मोदींनी व्यक्त केले. एक आजारी राज्य देखील प्रगती करू शकते, हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्‍यासाठी उद्योजकांना मोठी संधी आहे. या संधीचे त्यांनी सोने करावे. स्किल डेव्हलपमेंटवर जोर देत मोदींनी सांगितले की, राज्यातील लोकांनी राज्यात नोकरीचा शोध घ्यावा, राज्याला आपले योगदान द्यावे. मध्य प्रदेशातील विकास दर दोन टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर पोहोचला आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यादा मध्य प्रदेशात आले आहे. जनधन योजनेला सर्वाधिक प्रतिसाद मध्य प्रदेशात मिळाला आहे. 36 लाख बँक खाती उघडण्यात आल्याचे मोदींनी उद्योपपतींना 40 मिनिटे संबोधित केले.

कार्यक्रमाची सुरूवात मध्य प्रदेश गीत गायनाने झाली. प्रसिद्ध गायक शान यांनी गीत म्हटले. राज्याचे उद्योगमंत्री यशोधराराजे सिंधिया यांनी प्रास्ताविक मांडले. यावेळी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन उपस्थित होत्या.
'ग्लोबल इन्हेस्टर्स समिट-2014' तीन दिवस (8, 9 व 10 ऑक्टोबर) चालणार आहे. समिटला बुधवारी ब्रिलियंट कन्वेंशन सेंटर येथे केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. दुसर्‍या दिवशी समिटचे औपचारिक उद्‌घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, सायरस मिस्त्री, अनिल अंबानी, शशी रुइया, गौतम अदाणी, किशोर बियाणी, पवन मुंजाल यांच्यासह अन्य उद्योगपती उपस्थित होते.