आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री दोन वाजेपासून सुरू होते दर्शनबारी, दिवसातून तीनवेळा आरती, ९ प्रकारचे शृंगार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैहर - मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील मैहरच्या त्रिकूट पर्वतावर शारदा देवीचे मंदिर आहे. मैहर देवी म्हणूनदेखील हे ठिकाण परिचित आहे. विंध्याच्या या क्षेत्रावर वारंवार पुरासारखे नैसर्गिक संकट कोसळले आहे. अनेकदा सैन्यालाही पाचारण करायची वेळ आली. परंतु नवरात्र सुरू होताच मातेचा जयजयकार करत श्रीक्षेत्र दुमदुमून जाते.

सध्या त्रिकूट पर्वतावरील मंदिरामुळे पुन्हा नवचैतन्य आले आहे. झांझ, देवीची गाणी, नृत्य यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले आहे. परिसरात मेळा भरला आहे. त्यात छोट्या-छोट्या दुकानांतून पूजेचे साहित्य विक्रीला मिळते. परिसराला पुराचा फटका बसला असला तरी हळूहळू लोक सगळे विसरून सणोत्सवात मग्न होताना दिसू लागले आहेत. मंदिर प्रशासक सुरेश अग्रवाल म्हणाले, पुरामुळे यंदाच्या उत्सवात भाविकांची गर्दी कमी होईल, असा आमचा अंदाज होता. परंतु सिक्युरिटी मीटर तपासण्यात आले. तेव्हा दररोज ७० हजार भाविक दाखल होत असल्याचे स्पष्ट झाले. नवरात्रात भाविक सुमारे ४० लाख रुपयांचे दान देतात. इतर वेळी २० ते २५ लाख रुपयांचे दान जमा होते. मंदिराचे सभामंडपाचे क्षेत्रफळ केवळ २० हजार चौरस फूट आहे. भाविकांना मातेच्या दर्शनाची आस लागली आहे. दर्शनाच्या आेढीने डोंगर चढाईच्या कष्टाचाही लाखो भाविकांना जणू विसर पडू लागला आहे. कारण पुरामुळे डोंगरातील वाटा, पायऱ्यादेखील धोकादायक बनल्या आहेत. दर्शनबारी १६ तास चालते आहे. रात्री उशिरापासून भाविक रांगेत दिसू लागतात. हावडा, दिल्ली, जबलपूर व कटनी या सर्व रेल्वेगाड्या तूर्त बंद ठेवण्यात आल्या आहेत.

माता सतीचा हार याच त्रिकूट पर्वतावर पडला होता, त्यामुळे नगरीचे नाव मैहर
योद्ध्याला अमरत्वाचे वरदान: मुख्य पुजारी देवीप्रसाद म्हणाले, अग्निकुंडात सामावलेल्या सतीला घेऊन भगवान शंकर जात होते. ‘मातेचा हार’ या त्रिकूट पर्वतावर पडला होता. त्यामुळेच या ठिकाणाचा समावेश ५१ शक्तिपीठात झाला आणि त्यावरूनच नगरीचे नाव मैहर पडले. मातेची तीन वेळा आरती केली जाते. नऊ प्रकारचा शृंगारही केला जातो. १२ व्या शतकातील योद्धा आल्हा-उदल यांच्या वीररसाच्या कथा आजही सांगितल्या जातात. आल्हास शारदाने अमरत्वाचे वरदान दिले होते.
बातम्या आणखी आहेत...