आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gravity Of Crime Does Not Reduce Even After Accused Marries To Rape Victim Who Is Minor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्‍कारानंतर अल्पवयीन पीडितेशी विवाह केला तरी गुन्‍हा कमी होत नाहीः हायकोर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबलपूर- अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार केल्‍यानंतर आरोपीने पीडितेसोबत विवाह केला तरीही त्‍याचा गुन्‍हा कमी होत नाही, असे उच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

मध्‍य प्रदेश उच्‍च न्‍यायालयाच्‍या जबलपूर खंडपीठाने एका प्रकारणात हे मत नोंदविले आहे. या प्रकरणात एका अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार केल्‍याचा आरोप एका तरुणावर आहे. याप्रकरणाची सुनावणी कनिष्‍ठ न्‍यायालयात सुरु आहे. खटल्‍याचा निकाल अद्याप लागलेला नसतानाच आरोपी आणि पीडितेने विवाह केला. त्‍यानंतर दोन्‍ही पक्षांनी आपसी सहमतीने न्‍यायालयाबाहेर तडजोड केल्‍याचे सांगून खटला रद्द करण्‍यासाठी उच्‍च न्‍यायालयात अर्ज दाखल केला. त्‍यावर उच्‍च न्‍यायालयाने मत नोंद‍वून आरोपीला फटकारले.