भोपाळ - कमी खर्चात फळ भाज्यांना दीर्घकाळ ताजे ठेवणार्या ग्रीनहाऊस ड्रायरची निर्मिती भोपाळच्या मौलाना आझाद राष्ट्रीय औद्योगिक संस्थेच्या (मॅनिट) प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. अन्नप्रक्रिया उद्योग आणि शेतकर्यांसाठी हे संशोधन अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. तासाला ५५० किलोवॅट वीजेची बचत करण्यास सक्षम असलेले हे उपकरण मॅिनटच्या उर्जा विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. अनिल कुमार आिण रिसर्च स्कॉलर ओमप्रकाश यांनी बनवले आहे. यासाठी त्यांना याचे पेटंटही मिळाले आहे.
सध्याच्या ड्रायर्सपेक्षा उत्कृष्ट
हे ड्रायर फळ आणि भाजीपाल्याला वर्षभरापर्यंत सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे. फूड प्रोसेसिंग कंपन्या फळे आणि भाजीपाला सुरक्षित ठेवण्यासाठी सध्या फ्रीज ड्रायर, स्प्रे ड्रायर, ड्रम ड्रायर आणि स्ट्रीम ड्रायरचा उपयोग करतात. मात्र, या जुन्या उपकरणांना मोठ्या प्रमाणात वीज लागते. शिवाय, यामुळे फळांवरील प्रक्रियासुद्धा नीट होत नव्हती आणि त्यातील पोषक तत्वांवर परिणाम पडत होता. ओपन सन ड्राइंगमुळे धुळ, माती, िकड लागणे आणि अतिनील किरणांमुळे फळे आणि भाज्यांच्या रंगातही फरक पडत होता. मात्र, मॅिनटने तयार केलेल्या ग्रीनहाऊस ड्रायरमुळे या सर्व समस्यांवर तोडगा निघाला आहे.
अशाप्रकारे कार्य करतो ग्रीनड्रायर
ग्रीनडायर हे सौरऊर्जेवरील कुकरच्या पार्श्वभूमीवर कार्य करतो. या उपकरणात ठेवलेल्या फळांना आणि भाजीपाल्यांना आवश्यक तेवढ्या प्रमाणातच सुर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे त्यातील ताजेपणा कायम राहतो. सुर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात आत जाऊ नये यासाठी उपकरणाच्या वर पेंट लावण्यात आला असून तापमान नियंत्रणासाठी ड्राइंग ट्रे आणि बॅटरी बसवण्यात आली.
नुकसान भरपाई काढणार
देशात २७.८ दशलक्ष मेट्रीक टन फळ आणि भाजीपाल्यांचा उत्पादन होतो. डॉ. कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, ताजेपणा टिकून न राहिल्याने फळ आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फूड इंडस्ट्रीमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित ड्राइंग उपकरणांचा उपयोग केला जातो. मोठ्या कंपन्यांना हे उपकरण परवडणारे असले तरी लहान कंपन्या आणि शेतकर्यांना ते परवडत नाही.म्हणून ग्रीनड्रायर फायद्याचा ठरतो.
या फळांना अधिक फायदा
डॉ.कुमार यांच्या मते, ग्रीनड्रायर हे सफरचंद, अंगूर, अननस, केळी, वांगे, टमाटर, आलू, मिरची, लसूण इत्यादी फळ आणि भाज्यांना सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे.