आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Groom Arrested Before Marriage Cause Of Rape Blame

लग्‍नाच्‍या दिवशीच बलात्‍काराच्‍या आरोपाखाली नवरदेव अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्‍वाल्‍ेहर- मध्‍य प्रदेशमधील ग्‍वाल्‍ेहर शहरात एका नवरदेवास लग्‍नावेळी नात्‍यातील युवतीवर बलात्‍कार केल्‍याच्‍या आरोपाखाली अटक करण्‍यात आली.

मुरार पोलिस ठाण्‍याचे प्रभारी रत्‍नेश तोमर यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गऊला लाल टिपाराजवळ राहणा-या जनकसिंगने त्‍याच्‍या स्‍वत:च्‍याच लग्‍नात नरसिंहपूर येथून आलेल्‍या आपल्‍या नात्‍यातील एका बावीस वर्षीय मुलीवर बलात्‍कार केला.

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, विवाह सोहळयाच्‍या दिवशी (3 जून) संधी मिळताच जनकसिंगने हे घृणास्‍पद कृत्‍य केले. घटना घडल्‍यानंतर दोन दिवस नातेवाईकांनी घटना लपवण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, पीडित युवतीने आपल्‍या कुटुंबियांबरोबर जाऊन पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडित मुलीच्‍या तक्रारीनंतर आरोपी नवरदेव जनकसिंगला बलात्‍काराच्‍या आरोपाखाली अटक केली.