आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायको ही बहीण असल्‍याचे सांगून ‘ते’ मेंदी सोबत लावत होते चुना; एक कोटींची फसवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गँगमधील महिला सदस्‍य. - Divya Marathi
गँगमधील महिला सदस्‍य.
इंदौर (मध्‍यप्रदेश) – मुलांच्‍या तुलनेत मुलींची संख्‍या कमी होत आहे. त्‍यामुळे काही समाजामध्‍ये उपवर मुलांना लग्‍नसाठी मुलीच मिळत नाहीत. परिणामी, त्‍यांच्‍यावर मुंज्‍या म्‍हणून राहण्‍याची वेळ आली आहे. याच संधीचा फायदा घेत आपल्‍या बायकोला आपली सख्‍खी बहीण असल्‍याचे दाखवून विवाहोच्‍छुक मुलांची फसवणूक करणा-या सहा जणांच्‍या टोळीला मध्‍यप्रदेश पोलिसांनी पकडले.

त्‍यांच्‍याकडून आतापर्यंत विविध शहरांमध्‍ये अनेक तरुणांची फसवणूक केली असून, या माध्‍यमातून त्‍यांनी जवळपास एक कोटी रुपयांची माया जमवल्‍याचा अंदाज आहे. या टोळीमध्‍ये 4 पुरुष आणि 2 महिला आहेत.
अशी करत फसवणूक
वर्तमानपत्र, संकेतस्‍थळ या ठिकाणी लग्‍नासाठी वधू असल्‍याची जाहिरात दिली जात असे. त्‍यानंतर कुणी संपर्क केला तर ज्‍या मुलीच्‍या नावाने जाहिरात दिली तिचाच पती तिचा भाऊ बनून वराकडील मंडळची भेट घेत असे. रीतसर लग्‍न पार पडल्‍यानंतर दुस-याच दिवशी लग्‍न केलेली महिला तिच्‍या ख-या नव-याला भाऊ म्‍हणून सासरी बोलावत असे आणि माहेरी जायचे आहे असे सांगून दा‍गिने, रोख रक्‍कम घेऊन पळ काढत. त्‍यांनी आतापर्यंत इंदौर, जयपूर, रायगड, राजगड, उज्जैन, बड़वाह, सीहोर आणि आष्टा यासह इतर अनेक ठिकाणी असे प्रकारे अनेकांना फूस लावली. देवासमध्‍ये 15 लाख, भोपाळमध्‍ये 25 लाख, इंदौर, सिहोर आणि आष्टामध्‍ये जवळपास 20 लाख रुपयांची त्‍यांनी फसणूक केली. आठ वर्षांपासून त्‍यांचा हा गोरखधंदा सुरू आहे.
कसे अडकले पोलिसांच्‍या जाळ्यात वाचा पुढील स्‍लाइडवर