आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujrat Cm Narendra Modi And Madhya Pradesh Cm Shivraj Singh Chohan Dispute

वक्तव्याचे कवित्व: शिवराजसिंह-मोदींवरून भाजपमध्ये वादंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ/ हैदराबाद- भाजपमध्ये श्रेष्ठ कोण? गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी की मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान. या मुद्द्यावर पक्षात वादंग सुरू आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी ग्वाल्हेरमध्ये मोदींच्या तुलनेत शिवराज यांना उत्तम मुख्यमंत्री ठरवले. यावर मोदी यांनी पक्षाध्यक्ष राजनाथसिंहांकडे नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर राजनाथ यांनी सोमवारी हैदराबादेत मोदी सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे सांगून अडवाणींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे म्हटले. त्यातच मोदी वरिष्ठ आहेत. खालोखाल रमणसिंह आहेत. मी तिसर्‍या स्थानी आहे, असे शिवराज यांनी म्हटले आहे.

राजनाथ यांचे स्पष्टीकरण कशासाठी?
मोदी यांची नाराजी दूर करणे व पंतप्रधानपदावरून वाढती गटबाजी रोखण्यासाठी. मोदी यांनी शनिवारीच आक्षेप नोंदवला होता. खुद्द अडवाणी यांनीच या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावे असे त्यांचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. परंतु दोन दिवसांनंतरही अडवाणी राजी झाले नाहीत. त्यामुळे राजनाथ यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.

मग नरेंद्र मोदी का नाराज झाले?
गुजरातची विकासगाथा गाणार्‍या मोदींना अडवाणी यांचे वक्तव्य आवडले नाही. अडवाणींनी मोदींना समृद्ध गुजरातच्या भरभराटीचे श्रेय दिले. पण शिवराज यांना आजारी राज्य दुरुस्त करणार्‍या चमत्कारी नेत्याची उपमा दिली. शिवराज यांना अटलजींप्रमाणे अहंकाररहित संबोधले. मोदींत हा गुणविशेष नसल्याचा हा सूर होता.

शिवराजसिंह यांचे गुणगान का केले?
भाजपचे सरचिटणीस राजीवप्रताप रुडी यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. अडवाणी भोपाळमध्ये आले होते आणि मध्य प्रदेशच्या लोकांसमोर बोलत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी शिवराज यांचे गुणगान केले, असे रुडी यांनी म्हटले आहे.