आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे बाबा राम रहीम यांची लाइफ स्टाइल, लक्झरी गाड्यांचे मोठे कलेक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबा राम रहीम यांची आलिशान कार. - Divya Marathi
बाबा राम रहीम यांची आलिशान कार.
भोपाळ - मध्यप्रदेश सरकारने गुरमीत राम रहीम सिंग यांच्या एमएसजी-2 वर बंदी घातली आहे. स्वतःला आध्यात्मिक गुरु सांगणाऱ्या राम रहीम यांचा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटावरुन उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आंदोलन सुरु आहे. राम रहीम कोणत्याही निमीत्ताने कायम चर्चेत राहातात. कधी त्यांचे चित्रपट, तर कधी त्यांचे रंगी बेरंगी कपडे. त्यांचे रंगीत कपडे आता त्यांचे स्टाइल स्टेटमेंट झाले आहे. त्यांची फॅन फोलोइंग देखील मोठी आहे. त्यांनी एक आवाज दिल्यानंतर लाखोलोक जमा होतात. हरियाणामध्ये त्यांनी स्वच्छता अभियानाची घोषणा केली होती तेव्हा लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. केवळ हातात झाडू घेऊन ही स्वच्छता नव्हती तर नाल्यात उतरून त्यांच्या भक्तांनी स्वच्छता केली होती.

अशी जगतात लाइफ
एमएसजी-2 हा राम रहीम यांचा दुसरा चित्रपट आहे. यात त्यांचे जसे कपडे दिसतात, तसेच कपडे ते खासगी आयुष्यात वापरतात. त्यासोबतच लक्झरी गाड्यांमधून फिरणे हा देखील त्यांच्या लाइफस्टाइलचा भाग आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कार ते स्वतः डिझाइन करतात. राम रहीम यांच्यासाठीच्या कार अॅक्सिडेंट झालेल्या गाड्या मॉडिफाइड करुन तयार केल्या जातात. या आध्यात्मिक गुरुकडे एक स्कुटर देखील आहे तर एक हमर सारखी दिसणारी कार आहे. त्यांच्या अवतीभवती काळ्या कपड्यातील सुरक्षा रक्षक तैनात असतात.
कोण आहे गुरमीत राम रहीम
गुरमीत राम रहीम यांचा जन्म राजस्थानमधील गंगानगर जवळील गुरुसर मोडिया या गावात झाला आहे. त्यांचे वडील मघरसिंग आणि आई नसीबकौर आहेत. राम रहीम यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यातील एक मुलगी त्यांनी दत्तक घेतली आहे. 1990 मध्ये त्यांनी सत्संगादरम्यान सन्यास घेतला आहे. आता ते पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या भागात अध्यात्मिक गुरु आणि संत म्हणून ओळखले जातात. त्यांचा भक्तसंप्रदाय मोठा आहे. परदेशातही त्यांचे भक्त आहेत. आध्यात्मिक गुरु सोबतच आता ते अभिनेते झाले आहेत. एमएसजी-2 हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, राम रहीम यांचे फोटो...