आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसमोर 11 वर्षीय चिमुरडीवर बलात्‍कार, नराधमांनी मुलावर रोखली होती बंदुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्‍वालैर- मध्‍यप्रदेशातील ग्‍वालैरमध्‍ये 11 वर्षीय मुलीवर बलात्‍कार झाल्‍याची घटना समोर आली आहे. 30 ऑगस्‍टरोजी मध्‍यरात्री 1 वाजता ग्‍वालैरमधील बिजौली येथे ही घटना घडली. 3 नराधमांनी मध्‍यरात्री बळजबरीने घरात घुसुन आईचे तोंड दाबले व मुलावर बंदुक रोखून त्‍यांच्‍यासमोरच मुलीवर बलात्‍कार केला. घटनेनंतर तिन्‍ही आरोपी फरार झाले आहेत. त्‍यांचा अद्यापही शोध लागू शकलेला नाही. घटनेमुळे संपूर्ण कुटुंब दहशतीखाली आले आहे. 

आधी महलगाव, आता बिजौली, मात्र अटक एकही नाही 
- याआधी 20 ऑगस्‍टरोजी मध्‍यप्रदेशातील महलगाव येथेही तीन जणांनी घरात घुसुन 17 वर्षीय मुलीवर गँगरेप केला होता. तिघांनीही आपले चेहरे कपड्याने झाकले होते. 
- दुर्घटनेला 12 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही पोलिसांना एकाही आरोपीचा सुगावा लागू शकलेला नाही. या प्रकरणी पोलिसांकडे सीसीटीव्‍ही फुटेजही आहे
- आता बिजौलीमध्‍ये अशीच घटना घडली आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर इन्‍फोग्राफीक्‍सने जाणुन घ्‍या...नराधमांनी असे केले दुष्‍कृत्‍य  
बातम्या आणखी आहेत...