आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gwalior Hospital Sales Infants For Just ₹10,000

निर्लज्जपणाचा कळस, नवजात अर्भकांची विक्री केवळ 10,000 रुपयांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- लग्नाचे आमिष दाखवून तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलणे, नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणांना गुलाम बनवून श्रीमंत देशात विकणे, लहान मुलांना अपंग करुन भीक मागायला लावणे... खरंच मनुष्याने किती खालची पातळी गाठली आहे. पण थांबा जरा. ग्वाल्हेरची घटना ऐकाल तर तुमच्या अंगावर काटा उभा झाल्याशिवाय राहणार नाही. येथील एका रुग्णालयाने चक्क बाळांची बाजारपेठ मांडली होती. केवळ दहा हजार रुपयांना बाळ विकले जात होते!!! खरंच किती स्वस्त झालाय माणूस...
बलात्कार किंवा अपघातातून गर्भवती राहिलेल्या महिलांचे नवजात अभ्रक ग्वाल्हेरमधील पलाश या बेबी फार्ममध्ये एखादे प्रोडक्ट विकले जाते तसे विकले जात होते. आपत्य नसलेले कपल बाळ विकत घेण्यासाठी अगदी वेटिंग लिस्टवर राहायचे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पलाश रुग्णालयावर धाड टाकली. यावेळी दोन बाळांची विक्री रोखण्यास पोलिसांना यश आले.
पलाश रुग्णालयाचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की एखाद्या मुलीला किंवा महिलेला अबॉर्शनसाठी रुग्णालयात आणले की येथील डॉक्टर आधी काऊंन्सलिंग करायचे. गर्भपात करु नका. सुरक्षित आणि कुणालाही कळणार नाही असे गर्भवती राहा असे सांगितले जायचे. डिलिव्हरी झाली की मुलीला किंवा महिलेला डिस्चार्ज दिला जायचा. त्यानंतर या रुग्णालयाचा खरा काळा धंदा सुरु व्हायचा. बाळ हवे असलेले कपल शोधले जायचे. त्यांना स्वस्तात बाळ विकले जायचे.
पुढील स्लाईडवर वाचा, पलाश रुग्णालयाने नेमले होते बाळ विक्रीचे कमिशन एजंट.... एकदा केले होते बेबी स्वॅपिंग.....