आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gwalior Maratha King Jayajai Rao Scindia Had Big Treasure

वंशजांसाठी अब्जावधी रुपयांचा खजिना सोडून गेले होते महाराज जयाजीराव सिंधिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- 1857 मध्ये इंग्रजांसोबत झालेल्या संघर्षानंतरही महाराज जयाजीराव सिंधिया यांनी ग्वाल्हेर साम्राज्याला सुरक्षित ठेवले, विकसित केले आणि चांगले प्रशासन दिले. अनेक हल्ल्यानंतरही त्यांनी अब्जावधी रुपयांचा पिढीजात खजिना सुरक्षित ठेवला. सिंधिया घराण्याचे वंशज माधवराव द्वितीय यांच्यासाठी हा मौल्यवान खजिना सुरक्षितपणे मागे ठेवला होता.
गंगाजळीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक होते बीजक
19 जानेवारी रोजी जयाजीराव यांचा जन्मदिवस आहे. या निमित्त आम्ही त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत. इतर राजा-महाराजांप्रमाणेच सिंधिया राजघराण्याकडे अब्जावधी रुपयांचा खजिना होता. सिंधिया राजघराण्याच्या महाराजांनी हा खजिना किल्ल्यात गुप्तठिकाणी अगदी सुरक्षित ठेवला होता. या खजिन्याला गंगाजळी अशा नावाने संबोधले जाई. या खजिन्यापर्यंत जाण्यासाठी रहस्यमय कोडवर्ड आणि तत्कालिन सुरक्षा यंत्रणा वारण्यात आल्या होत्या. त्याला बीजक असे म्हटले जाई. 1857 मध्ये महाराजांनी हा खजिना इंग्रज आणि स्वातंत्र्य सैनिकांपासून अतिशय सुरक्षित ठेवला होता.
पुढील स्लाईडवर वाचा, केवळ महाराजा जयाजीराव यांना माहिती होते बीजकचे रहस्य....