आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेस्तराँमध्ये अर्धा ग्लास पाणी सर्व्ह करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - रेस्तराँमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बचतीसाठी दैनिक भास्कर आणि फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्तराँ असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एफएचआरएआय) मोहिमेचा गुरुवारी इंदूरमध्ये एफएचआरएआयच्या ५१ व्या राष्ट्रीय परिषदेत शुभारंभ झाला. या मोहिमेअंतर्गत एफएचआरएआयशी संबंधित जवळपास ४००० रेस्तराँमध्ये आगंतुकांना अर्धा ग्लास पाणी सर्व्ह केले जाईल. रेस्तराँच्या टेबलांवर टेंट कार्ड््सच्या माध्यमातून पाणी प्यायल्यानंतर अर्धवट राहिलेले पाणी वाया जाऊ नये यासाठी आवश्यक तेवढेच पाणी सर्व्ह केले जाईल,असे निवेदन केले जाईल.आंतरराष्ट्रीय मार्केट रिसर्च एजन्सी ‘मार्केट सेपिएन्स’ आणि दैनिक भास्करद्वारे केलेल्या सर्वेक्षणात दररोज रेस्तराँमध्ये येणाऱ्या व्यक्तींद्वारे ग्लासांमध्ये जेवढे पाणी ठेवले जाते त्यातून दररोज जवळपास १६ एमएलडी(सुमारे १६० लाख लिटर) पिण्याचे पाणी वाया जाते. अशी स्थिती पाहता दैनिक भास्कर आणि एफएचआरएआयची ही मोहीम महत्त्वपूर्ण आहे. मोहिमेच्या शुभारंभानिमित्त एफएचआरएआयचे अध्यक्ष भरत मलकानी म्हणाले की, दैनिक भास्कर आणि एफएचआरएआय एकत्र मिळून काम करतील आणि हे टेंट कार्ड संपूर्ण देशात घेऊन जाऊ. परिषदेमध्ये भास्करच्या कॉमिक्स फॉर चेंज मालिकेतील दुसरे कॉमिक्स ‘सुंदरवन अॅडव्हेंचर्स-द बिग ब्लॅकआऊट’चे प्रकाशन झाले. कॉमिक्सच्या या मालिकेच्या माध्यमातून पाणी, वीज व अन्नाची बचत करण्याचे संदेश कॉमिक व्यक्तिरेखांतून दिले जात आहेत.
बातम्या आणखी आहेत...