आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hand Less Skilled Driver, Not Provision To Give Licenses

बिनहाताचा कुशल चालक, परवाना देण्याची कायद्यात तरतूद नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - हाताविना कार चालवणा-या विक्रम अग्निहोत्री यांच्या वाहन चालवण्याच्या परवान्याबाबत आरटीओने शंका उपस्थित केली. कारण त्यांना हात नसल्याने ते ते पायाने कार चालवतात. हाच मुख्य आक्षेप आहे. ७ वर्षांचे असताना एका अपघातात दोन्ही हात गमावलेले विक्रम गर्दीतून आरामशीर कार चालवत असल्याचा दावा करतात. मात्र, त्यांच्या मार्गात कायदेशीर अडचणी आहेत. परिवहनमंत्री भूपेंद्रसिंह यांच्या म्हणण्यानुसार, विक्रम यांची स्पेशल ड्रायव्हिंग टेस्ट घेऊन परवाना देण्याचा विचार होऊ शकतो.

अशा पद्धतीचे पहिले उदाहरण
जगभराचा विचार करता अनेक देशांमध्ये अपंगांना वाहन चालवण्याची परवानगी आहे. आपल्या देशात तशी तरतूद नाही. परदेशामध्ये वाहन चालवण्याच्या बहुतांश प्रकरणांत लोकांनी कारमध्ये बदल करून स्टिअरिंग पायांजवळ आणले आहे. विक्रम कोणत्याही बदलाशिवाय सहजपणे गाडी चालवतात.

आयआयएममध्ये दोन वेळा निवड
जर्मनीमध्ये शालेय शिक्षण, इंदूरमधून बी.कॉम., एम.ए.नंतर विक्रम आता एलएलबी करत आहेत. दोन वेळा आयआयएम अहमदाबादसाठी निवड झाली. मात्र, शारीरिक अक्षमतेमुळे त्यांना प्रवेश मिळू शकला नाही.

इतर कौशल्ये
स्विमिंग, फुटबॉल, खांद्याने शेव्हिंग, पायाने टायपिंग, नाकाने स्मार्टफोन वापरणे.

परवान्यात कलम आठचा अडथळा
देशातील मोटार व्हेइकल अ‍ॅक्ट १९८८ च्या कलम ४ मध्ये अशा परवान्याचा उल्लेख आहे. कलम ८(३) नुसार आजारी किंवा दुर्बल असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र यासाठी घ्यावे लागते. यामुळे परवाना घेण्यात अनंत अडचणी येतात.

इच्छाशक्तीतून पायांच्या मदतीने कार चालवायचे शिकलो. आता कुठेही कार चालवू शकतो. परिवहन विभाग कायदेशीर अडचणींचे कारण देत परवान्यास नकार देत आहे. - विक्रम अग्निहोत्री

पायांच्या मदतीने वाहन चालवणे मोठी बाब आहे. अधिका-यांशी चर्चा करून चाचणी घेता येईल. त्यात ते यशस्वी झाल्यास नियम बाजूला सारून परवाना दिला जाऊ शकतो.
- भूपेंद्रसिंह, परिवहनमंत्री