आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधिया स्कूल रॅगिंग प्रकरण: पोर्न पाहाण्याची सिनीयर्सकडून बळजबरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) - बिहारच्या सहकार मंत्र्याच्या मुलासोबत येथील प्रतिष्ठीत सिंधिया स्कूलमध्ये झालेल्या रॅगिंगनंतर शाळेमध्ये किती विकृत पद्धतीने सहकारी विद्यार्थी किंवा सिनियर्स वागतात याची उदाहरणे आता पालक देत आहेत. सिनीयर्सच्या परवानगीशिवाय अंघोळ करु दिली जात नाही. सिनीयर्सचे अंडरगारमेंट्स धुण्याची सक्ती केली जाते. मेसमधून अन्नाची चोरी केली नाही तर बेदम मार दिला जातो, असे आरोप पालक करत आहेत.
प्रतिष्ठीत सिंधिया स्कूलमध्ये बिहारचे सहकार मंत्री जयकुमार सिंह यांच्या मुलाचे रॅगिंग प्रकरण समोर आल्यानंतर तीन विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. आरोपी विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. जयकुमार सिंह यांच्या मुलाला गंभीर अवस्थेत स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर त्याला दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
पोर्न मुव्ही पाहाण्याची केली जाते जबरदस्ती
सिंधिया स्कुलच्या होस्टेलमध्ये नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत अमानवीय व्यवहार केला गेला होता. रॅगिंगने त्रस्त झाल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बिहारच्या सहकार मंत्र्याच्या या मुलावर वेळेवर उपचार झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, सिंधिया स्कुलमध्ये हा प्रकार नवीन नाही. कित्येक महिन्यांपासून येथे विद्यार्थ्यांची रॅगिंग आणि सार्वजनिकरित्या त्यांचा अवमान केला जातो. सहा महिन्यांपूर्वी बरेली (उत्तर प्रदेश) डॉ. अग्रवाल यांच्या मुलासोबतही असाच प्रकार घडला होता. त्यांनी शाळेच्या प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली होती. तेव्हा त्यांना रॅगिंग करणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाईचे आश्वासन देऊन शांत करण्यात आले होते. आता पुन्हा या शाळेतील रॅगिंगचे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी 'दिव्य मराठी नेटवर्क'कडे आपल्या मुलासोबत झालेल्या गैरवर्तनाची माहिती दिली आहे.
डॉ. अग्रवाल यांनी शाळा प्रशासनाला जो मेल पाठविला होता तोच त्यांनी 'दिव्य मराठी नेटवर्क'ला पाठविला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की सिनीयर्स विद्यार्थी त्यांच्या मुलाला पोर्न फिल्म पाहाण्याची बळजबरी करत. त्याच्याशी अश्लिल भाषेत बोलत. शिव्या देत. सिनीयर्स विद्यार्थी ज्युनिअर्सना त्यांचे अंडरगारमेंट्स धुण्यास सांगत. त्यांच्याकडून बरीच वाईट कामे करुन घेत. स्पोर्टसनंतर विद्यार्थी घामा-घूम झाल्यानंतर त्यांना अंघोळीसाठी सिनीयर्सची परवागनी घ्यावी लागे. त्यांनी नकार दिला तर त्यांना अंघोळ देखील करता येत नव्हती. सिनीयर्सच्या इच्छेविरुद्ध वागल्यानंतर मार खावा लागे.
डॉ. अग्रवाल यांनी सांगितले, की त्यांच्या मुलाला मेसमधून अन्नाची चोरी करण्यास सांगण्यात आली. त्याने नकार दिल्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर ते मुलाला शाळेतून काढू इच्छीत होते. मात्र, शाळा प्रशासनाने गैरवर्तन करणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले, मात्र कोणतीही कारवाई केली नाही.

पुढील स्लाइडमध्ये, सिंधिया स्कुलचे होस्टल आणि कॅम्पस.