आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य : कंबरदुखी आणू शकते ‘हिप ट्रान्सप्लांट’ची वेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - कमरेखालच्या भागात वेदना असतील आणि विश्रांती घेऊनही वाढत असतील तर हा दुर्लक्ष करण्यासारखा आजार नाही. ‘हिप ट्रान्सप्लांट’चीही वेळ येऊ शकते. नवव्या राष्‍ट्रीय मेडिसिन अपडेट कार्यक्रमात रविवारी लष्करी रुग्णालयातील रुमॅटॉलॉजिस्ट डॉ. वेद चतुर्वेदी यांनी हा इशारा दिला. अनेक डॉक्टरांनाही आजाराचे गांभीर्य कळले नसल्याचे ते म्हणाले.
‘स्पायनल ऑर्थराइटिस’ म्हणून ओळखला जाणारा हा अनुवांशिक आजार 22 ते 30 वयोगटातील पुरुषांमध्ये अधिक आढळून येतो. यावर वेळेवर उपचार आवश्यक असल्याचे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.
वजनवाढीला घाबरू नका
वजन वाढले तरी रक्तदाब वा अन्य आजार नसतील तर घाबरू नका. उलट या व्यक्ती इतरांपेक्षा मधुमेहाशी अधिक सक्षमपणे लढू शकतात, असे दिल्लीचे डॉ. राजीव सिंगला म्हणाले.
बोन मॅरो ट्रान्सप्लांट
ब्लड कॅन्सरवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले तर रुग्ण वाचण्याची शक्यता वाढते, असे डॉ. राहुल भार्गव म्हणाले.