आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात पुरात 6 जण वाहून गेले, आसाममध्ये लष्कराकडून रेस्क्यू ऑपरेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छतरपूरमध्ये असे सुरु आहे मदतकार्य. - Divya Marathi
छतरपूरमध्ये असे सुरु आहे मदतकार्य.
भोपाळ - मध्यप्रदेशातील सतना, रीवा येथे जोरदार पाऊस आणि नुकासान झाल्यानंतर शनिवार सकाळपासून भोपाळ, रायसेन, पचमढी, होशंगाबाद, इटारसी येथे मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने वेगवेगळ्या घटनेत 11 बळी घेतले आहेत. मुरैना जिल्ह्यातील चंबळ नदीत तीन युवक बुडाले. तर, दमोह, मंडला आणि सिवना येथे दोन महिलांसह एक व्यक्ती वाहून गेला. आसाममध्येही जोरदार पाऊसामुळे पुरस्थिती आहे. तिथे लष्कराला पाचारण करण्यात आले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

सगळीकडे पाणीच पाणी, भोपाळमध्ये रात्रभर कोसळला पाऊस
> पावसामुळे मध्यप्रदेशातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी झगडावे लागत आहे.
> नरसिंहपूर, होशंगाबादसह अनेक भागात लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.
> भोपाळमध्ये रात्रभर पाऊस कोसळत असल्यामुळे अनेक भागांचे बेटात रुपांतर झाले आहे.
> राज्यात जिथे सतत पाऊस होत आहे त्या जिल्ह्यातील शाळांना आज सुटी देण्यात आली.
> नदी - नाल्यांच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागांना पूरचा धोका आहे.
> हवामान खात्याने भोपाल, विदिशा, रायसेन, सागर, दमोह, सतना, होशंगाबाद, बैतूल, जबलपुर आणि नरसिंहपुर येथे जोरदार पावासाचा इशारा दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...