आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशातील रीवा-सतनामध्ये पूरस्थिती, 7 जणांनी झाडावर काढली रात्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रीवामध्ये अचानक आलेल्या  पुरामुळे लोक सैरभैर झाले आणि काही झाडांवर चढले. सात जणांनी बुधवारची रात्र झाडांवर काढली. त्यांना लष्कराच्या मदतीने वाचवण्यात आले. - Divya Marathi
रीवामध्ये अचानक आलेल्या पुरामुळे लोक सैरभैर झाले आणि काही झाडांवर चढले. सात जणांनी बुधवारची रात्र झाडांवर काढली. त्यांना लष्कराच्या मदतीने वाचवण्यात आले.
भोपाळ/नवी दिल्ली - मध्य प्रदेशात दोन दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रीवा जिल्ह्यातील टमस नदीमध्ये अडकलेल्या तीन जणांना 24 तासांनंतर लष्कराने हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षीत बाहेर काढले.
बुधवारी संध्याकाळी अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. जीव वाचवण्यासाठी सात जण झाडांवर चढले आणि तिथेच रात्र काढली.
चार जणांनी पाण्यातून काढला मार्ग
गुरुवारी सकाळी चार जणांनी पोहून पाण्यातून मार्ग काढला मात्र तीन जण तिथेच अडकलेले होते. त्यांना मोटर बोटने वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र बोटही वाहून गेली. सायंकाळी लष्कराने हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. रीवामध्ये वाहत्या पाण्यासोबत सेल्फी घेण्याच्या नादात पाच युवक तर, भिंडमध्ये पुरात दोन युवक वाहून गेले. मध्य प्रदेश शिवाय उत्तराखंड आणि आसाममध्ये पाऊसाने कहर केला आहे. यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटला
> मध्य प्रदेशात नद्या दुथडी भरून वाहात आहेत, तर काही ठिकाणी नदीतील पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने रस्त्यांवर पाणी आले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
> रस्त्यांवर पाणी आल्याने शेकडो गावांसोबतचा संपर्क तुटला आहे.
> जबलपूर, सतना आणि सागर हे तीन जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. येथे मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
> श्योपूर येथे पार्वती नदीचे पाणी पुलावरुन वाहू लागल्यामुळे राजस्थानमधील कोटाकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.
> मध्य प्रदेश प्रमाणेच उत्तराखंड आणि आसाममध्ये लाखो लोक पावसामुळे त्रस्त आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रस्त्यावर पाणीच पाणी, नवरदेवाला न्यावे लागले उचलून...
> शेवटच्या स्लाइडवर पाहा VIDEO मध्यप्रदेशातील पावसाचा कहर

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...