आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MP मध्ये पावसाचा कहर, 11 जणांचा मृत्यू 6 बेपत्ता; उज्जैन ठप्प, CM गेले गावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो उज्जैन-इंदूर हायवेचा आहे. उज्जैन शहरासह आसपासच्या सर्व वस्त्या आणि गावांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे दोन्ही बाजुंनी नदी वाहात आहे आणि महामार्ग एखाद्या पुलाप्रमाणे भासत आहे. - Divya Marathi
फोटो उज्जैन-इंदूर हायवेचा आहे. उज्जैन शहरासह आसपासच्या सर्व वस्त्या आणि गावांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे दोन्ही बाजुंनी नदी वाहात आहे आणि महामार्ग एखाद्या पुलाप्रमाणे भासत आहे.
उज्जैन - मध्यप्रदेशात सोमवारपासून सुरु असलेल्या पावसाने सोमवारी देखील दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहा लोक बेपत्ता आहेत. सिहोर जिल्ह्यातील बुदनी येथे 11 जण वाहून गेले. त्यातील 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे गाव बुदानीपासून जवळच आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते तत्काळ गावाकडे रवाना झाले.
जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक पाऊस उज्जैनमध्ये झाला असून येथील परिस्थिती अधिक बिकट आहे. गेल्या 48 तासांत येथे 22.21 इंच पाऊस कोसळला आहे. वर्षभरात होणाऱ्या सरासरी पावासाच्या निम्मा पाऊस झाला आहे. वीज गुल झाली असल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे इंदूरमध्येही जोरदार पावसाची नोंद झाली आहे.

वीज कोसळून तिघांचा मृत्यू
टीकमगड जिल्ह्यातील किशोरपूरा गावात एकाच कुटुंबातील तिघांवर वीज कोसळली, त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. बुऱ्हाणपूर येथे 33 वर्षांच्या एका व्यक्तीचा मृतदेह नदीत तरंगताना आढळला. देवास जिल्ह्यात दार अंगावर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.
मंगळवारीही जोरदार पाऊस
हवामान खात्याने दिलेल्या महितीनूसार बंगालच्या खाडीत तयार झालेल्या वातावरणामुळे मध्यप्रदेशमध्ये मुसळधार सुरु आहे. हे वातावरण अजूनही जैसे थे असल्यामुळे सोमवारप्रमाणेच मंगळवारी देखील राज्यात जोरादार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामाना खात्याने भोपाळ, उज्जैन आणि मंदसौर जिल्ह्यात येत्या चोविस तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पावसाचा कहर
बातम्या आणखी आहेत...