आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार, महापूर, विध्वंस: निवडक 17 फोटोंमध्ये बघा MP मधील विदारक स्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरदा/खंडवा- मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून रस्ते-पूल जलमग्न झाले आहेत. सुरवातीला उज्जैनमध्ये पूराने हाहाकार झाला होता. आता हरदा, बैतुल आणि होशंगाबादमध्ये जनजिवन विस्कळित झाले आहे. माचक नदीवरील रेल्वेरुळाचा भराव वाहून गेल्याने दोन एक्स्प्रेस दुर्घटनाग्रस्त झाल्या आहेत. काल सायंकाळ पासूनच माचक नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत होती. त्यामुळे परिसरातील गावे रिकामी करण्यात आली होती. त्यात भरीस भर म्हणजे मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आज सकाळी बालाघाट, बैतुल, खंडवा, हरदा, होशंगाबाद, इटारसी जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस झाला. यामुळे ताप्ती, माचक, नर्मदा, बेतवा, क्षिप्रा, चंबळ यांच्यासह लहान मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. या भागांमध्ये परिस्थिती धोकादायक झाली आहे.
घरांमध्ये बंधिस्त झाले लोक
मध्य प्रदेशातील काही गावांमध्ये चोविस तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. रस्त्यांवर पाणी साचून असल्याने लोकांनी स्वतःला घरीच बंधिस्त करुन घेतले आहे. शाळा, महाविद्यालये ओस पडले आहेत. दैनंदिन व्यवहार ठप्प पडले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पुराने वेढल्या गेलेल्या लोकांना घराबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, मध्य प्रदेशातील भीषण पुरस्थिती... नद्या धोकादायक पातळीवर... पुराच्या पाण्याने सर्वत्र हाहाकार...
बातम्या आणखी आहेत...