आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रस्त्यांच्या झाल्या नद्या, पायवाटांवर पाण्याचे प्रवाह, मध्य प्रदेशात मुसळधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- भोपाळमधील एक रस्ता असा जलमग्न झाला आहे.)
भोपाळ- आठ दिवसांपासून हुशंगाबाद आणि इंदूर येथे अडकलेल्या मॉन्सुनचे काल (सोमवार) भोपाळ, जबलपूर, बैतुल या शहरांमध्ये जोरदार आगमन झाले. पहिल्याच दिवशी पावसाने आपले रौद्ररुप दाखवले. सायंकाळी पाच पर्यंत 9.22 सेमी पावसाची नोंद करण्यात आली. सध्या मॉन्सून मध्य प्रदेशातील रतलाम, सीहोर, रायसेन या मार्गाने जात तेंदूखेडा, जबलपूर, डिंडोरी, अनूपपूरपर्यंत पोहोचला आहे. तीन-चार दिवसांत संपूर्ण मध्य प्रदेशला मॉन्सून आपल्या कवेत घेईल. गेल्या वर्षी भोपाळमध्ये 7 जुलैला मॉन्सुन आला होता.
मध्य प्रदेशात मॉन्सुनने जोरदार धडक दिली असल्याने रस्त्यांच्या जागी नद्या झाल्या आहेत. पायवाटांवर तर पाण्याचे मोठमोठे प्रवाह सुरु झाले आहेत. त्यामुळे लोकांना या पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
पुढील स्लाईडवर बघा, भोपाळसह मध्य प्रदेशातील रस्ते असे झाले आहेत जलमग्न....