आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Helmet Checking Campaign In Shivpuri Madhya Pradesh News In Marathi

लग्नाला जातेय, हेल्मेट घातले तर केस विस्कटतील ना; महिलेचे पोलिसांना प्रत्युत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवपुरी- विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्‍यांवर शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विशेष अभियान राबवले.

एका महिलेला पोलिसांनी रोखले असता, 'मी लग्नाला निघाली आहे. हेल्मेट घातले असते तर केस विस्कटले असते.' असे तिने उत्तर ‍दिले. दुसरी एक महिला म्हणाली, 'माझे ऑफिस जवळच आहे. प्लिज मला जाऊ द्या'. दोन्ही महिलांकडून प्रत्येकी शंभर रुपये दंड आकारण्यात आला.
मला देऊ नका, दंड भरा- वाहतूक पोलिस
या दरम्यान एका वकील दाम्पत्याने वाहतूक पोलिसांना चिरीमिरी देण्याचा प्रयत्न केला. त्यावर एक वाहतूक पोलिस म्हणाला, 'मला देऊ नका, दंड भरा'. वकील दाम्पत्याकडून दंड वसूल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडले.

दरम्यान, तरुणाई केस विस्कटतील म्हणून हेल्मेट घालत नाहीत. परंतु, हेल्मेट न घातल्यामुळे झालेला अपघात जिवावर बेतणारे असू शकतात. हेल्मेटचा नियम दुचाकी चालवणार्‍यांच्या भल्यासाठीच आहे, अशी समज देखील पोलिसांनी यावेळी दिली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, शिवपुरी वाहतूक पोलिसांच्या वाहन तपासणी अभियानाचे photo