आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Court Cancels Membership Of MLA In Madhya Pradesh

मध्य प्रदेशात खोटे आरोप करणार्‍या आमदाराचे सदस्यत्व रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- निवडणूक प्रचार काळात विरोधी आमदारावर केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मध्य प्रदेशात उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने अपक्ष आमदाराचे सदस्यत्व रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल दिला आहे. अपक्ष आमदार पारस सकलेचा यांना याचा फटका बसला असून त्यांना न्यायालयाने 20 हजारांचा दंडही ठोठावला. त्यांच्या विरोधात भाजपचे पराभूत उमेदवार हिम्मत कोठारी यांनी याचिका दाखल केली होती.

मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री राहिलेल्या कोठारी यांनी अपक्ष आमदार पारस सकलेचा यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एम.सी. गर्ग यांनी शुक्रवारी हा महत्वपूर्ण निकाल दिला. सकलेचा यांनी कोठारी यांच्यावर त्यांची पुणे मुंबईत जमिनी, हॉटेल्स असल्याचा तसेच त्यांनी वनमंत्री असताना अनेक घोटाळे केल्याचा आरोप केला होता. या तथ्य नसलेल्या आरोपांमुळे भाजप उमेदवाराची प्रतिमा मलिन झाली व त्यांना पराभव स्वीकारावा लागला, असे न्यायालयाने म्हटले खोट्या आरोपांसाठी न्यायालयाने सकलेचा यांना 20 हजारांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने सकलेचा यांचे वर्तन गैरवर्तन असल्याचा ठपका ठेवला आहे. या निकालानंतर निवडणूक आयोग सकलेचा यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालू शकतो.