आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतमर्यादा वाढवण्यासाठी 50 लाखांची लाच, सिंडिकेट बँक सीएमडीला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / भोपाळ - एका हायप्रोफाइल प्रकरणात सीबीआयने शनिवारी सिंडिकेट बँकेचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस. के. जैन यांना बंगळुरूत अटक केली. दिल्लीत कार्यरत जैन यांना बंगळुरूत अटक झाली. त्यांच्यावर बहुचर्चित कोळसा घोटाळ्यात आरोपी दोन कंपन्यांकडून 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. जैन यांना ही रक्कम भोपाळमधील कॉँग्रेसचे नेते तथा वकील विनीत गोधा व त्यांचा बिल्डर भाऊ पुनीत यांच्यामार्फत देण्यात आली होती. जैन यांचे मेहुणे असलेल्या गोधा बंधूंना सीबीआयने मुद्देमालासह भोपाळमध्ये अटक केली. या प्रकरणी दिल्लीतील विजय पाहुजा या व्यापार्‍यालाही अटक झाली.
सीबीआयने या अटकसत्रासाठी दिल्ली, बंगळुरू, मुंबई आणि भोपाळमधील 20 ठिकाणी छापे टाकले. सीबीआयने जैन, गोधा बंधू आणि पाहुजासह 11 जणांना आरोपी केले आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, छाप्यात जैन यांच्याकडून रोख 21 लाखांसह दीड कोटींपेक्षा जास्त किमतीचे दागदागिने व 63 लाख रुपयांच्या एफडी मिळाल्या. सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा यांनी दिल्लीत सांगितले की, जैन यांनी नियमाविरुद्ध जाऊन दोन कंपन्यांना क्रेडिट लिमिट वाढवण्यासाठी 60 लाख रुपये मागितले होते.

विनीत गोधा
काँग्रेसचे माजी प्रवक्ता विनीत गोधा वकील आहेत. काँग्रेस व भाजपशी संबंधित व्यावसायिकांशी संबंध. व्यापमं घोटाळ्यात तुरुंगात गेलेले सुधीर शर्मा त्यांचे निकटवर्तीय.
सहभाग : लाचेची रक्कम जैनांपर्यंत पोहोचवण्याचे काम.

100 कोटीच्या कर्जासाठी लाच
बंगळुरूची डिफॉल्टर कंपनी भूषण स्टील्स लि.कडे बँकेचे आधीचे 100 कोटींचे कर्ज थकित आहे. तरी कंपनीचे मालक नीरज सिंघल व एमडी वेदप्रकाश अग्रवाल क्रेडिट लिमिट वाढवून आणखी 100 कोटी मागत होते. त्यासाठी जैन यांनी लाच मागितली होती. अशाच प्रकरणात दिल्लीतील विपुल अग्रवालनाही आरोपी करण्यात आले आहे.