आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झूठ बोले कौआ काटे ’चे गीतकार विठ्ठलभाईंचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सागर- गीतकार तथा काँग्रेस सरकारमध्ये उद्योगमंत्री राहिलेले 78 वर्षीय विठ्ठलभाई पटेल यांचे शनिवारी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. पटेल यांच्या पश्चात पत्नी कमो बेन, पूत्र संजय व मुलगी आरती असा परिवार आहे. 21 मे 1936 मध्ये सागरमध्ये जन्मलेल्या पटेल यांची ओळख जुन्या अविट गाण्यांचे गीतकार म्हणून आले. त्यांनी प्रसिद्ध गायक किशोर कुमार, मुकेश व चित्रपट अभिनेता राज कपूर यांच्यासोबत काम केले होते. बॉबी चित्रपटातील त्यांनी लिहिलेले ‘झूठ बोले कौआ काटे ’ हे गाणे खूप गाजले. चित्रपट ‘दरिया दिल ’ मधील ‘वो कहते है हमसे अभी उमर नही है प्यार की..’ देखील त्यांनीच लिहिले. उद्योग मंत्री असताना त्यांनी बुंदेलखंड भागातील लोकांसाठी अनेक योजना आणाल्या.