आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांडवाच्या शेरूवर हॉलीवूड चित्रपट, फेब्रुवारी महिन्यात चित्रिकरणास होणार सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडवा - मध्य प्रदेशमधील खांडवाचा सारू ब्रॉली (शेरू) याचे वास्तविक जीवन आता हॉलीवूडच्या पडद्यावर झळकणार आहे. त्याने लिहिलेल्या ‘अ लाँग वे होम’ या आत्मचरित्रावर बनत असलेल्या ‘लॉयन’ या हॉलीवूडपटाची काही दृश्ये फेब्रुवारी महिन्यात खांडवामध्ये चित्रित केली जाणार आहेत. या चित्रपटाच्या काही भागाचे कोलकात्यात चित्रीकरण सुरू आहे.

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये विन्स्टेन कंपनीने १२ दशलक्ष डॉलरमध्ये या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहे. ‘स्टोरी ऑफ युअर लाइफ’ या चित्रपटानंतर (२० दशलक्ष डॉलर) कान महोत्सवात लावण्यात आलेली ही दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी बोली होती. या चित्रपटात स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील अभिनेता देव पटेल आणि हॉलिवूड अभिनेत्री निकोल किडमॅन मुख्य भूमिकेत असणार आहेत. सी सॉ फिल्म प्रा. लिमिटेड आणि सन स्टार एंटरटेनमेंट या दोन्ही कंपन्या मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. २०१२ मध्ये हे ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असलल्या सारूने गुगल अर्थवरून त्याचे घर शोधले आणि आईला भेटण्यासाठी खांडवात आला. या घटनेला जगभरातील माध्यमांनी बरीच प्रसिद्धी दिली होती. त्यानंतर सारूने ‘द लाँग वे होम’ नावाने आत्मचरित्रही लिहिले. त्याच्या या आत्मचरित्रावर चित्रपट बनवण्यासाठी अनेक निर्मात्यांनी सारूसमोर प्रस्ताव ठेवला.कान फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांनी हा चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली.

चित्रीकरणास सुरुवात
४ जानेवारी रोजी कोलकात्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ झाला. ११ फेब्रुवारीपासून मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये शूटिंग केली जाणार आहे. यासाठी देवास, इंदूर आणि खांडवामध्ये हॉलीवूडची १५० सदस्यीय टीम येणार आहे.

‘लॉयन’चे कथानक
पाचवर्षीय शेरू मुन्शी खानला (आता शारू ब्राली) रेल्वे प्रवासात झोप लागते व तो भावापासून दुरावला जातो. कोलकात्यात पोहोचल्यानंतर तेथील एक समाजसेवी संस्था त्याचे पालनपोषण करते. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील एक कुटुंब त्याला दत्तक घेते. २५ वर्षांनंतर तो एक यशस्वी उद्योजक बनून समोर येतो. बालपणीच्या काही आठवाणींच्या आधारे तो गुगल अर्थवरून खंडवातील त्याचे घर शोधून काढतो.