आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनर किलिंग? चुलत भाऊ-बहिणीची निर्घृण हत्या, आज होता तरुणीचा विवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत चंद्रभान सिंह (23) आणि बडी राजा (21) - Divya Marathi
मृत चंद्रभान सिंह (23) आणि बडी राजा (21)
भोपाळ- मध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यात एका प्रेमी युगुलाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. मृत तरुण-तरुणी चुलत भाऊ-बहीण आहेत. दोघांचे मृतदेह गावापासून एक किलोमीटर अंतरावर एका शेतात आज (गुरुवार) सकाळी आढळून आले आहेत. मृत तरुणीचा गुरुवारी विवाह आयोजित करण्‍यात आला होता.

मिळालेली माहिती अशी की, टीकमगड जिल्ह्यातील मोहनगड तालुक्यातील हनुपुरा गावातील चंद्रभान सिंह (23) आणि बडी राजा (21) हे चुलत भाऊ-बहिण बुधवारी रात्री 10 वाजेपासून बेपत्ता होते. गावाबाहेरील शेतात एका झाडाखाली दोघांचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आले. दोघांची गोळ्या घालून हत्या करण्‍यात आली.

तरुणीचे तिच्या चुलत भावावर प्रेम असल्याची माहिती म‍िळाली आहे. त्यामुळे नातेवाइकांनीच दोघांची निर्घृण हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मृत तरूण बेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणातील आरोपी आहे. दोन दिवसांपूर्वीच तो तुरुगांतून बाहेर आला होता.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत बडी राजा या तरुणीचे पूर्वी रंजीत नामक एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. रंजीत हा तरुण मागील काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे या हत्याकांडाचा गुंता आणखी वाढला आहे. पोलिस तरुणीचे जुने प्रेमसंबंध आणि ऑनर किलिंग अशा दोन्ही बाजूने तपास करत आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा,संबंधित फोटो...