आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband And Wife Commits Suicide By Triggering Explosives

PHOTOS: स्फोटानंतर पतीचे शिर 45 फुट दूर अंतरावर तर पत्नीचे छतावर सापडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीमच (मध्य प्रदेश)- येथील पीपरवा गावातील एका घरात झालेल्या स्फोटात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर त्यांच्या मृतदेहाच्या अक्षरशः चिधड्या उडाल्या. कौटुंबीक वादातून दोघांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिस महानिरिक्षक मधुकुमारन यांनी सांगितले आहे.
45 फूट दूर जाऊन पडले पतीचे शिर तर छतावर मिळाले पत्नीचे
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मृत्युमुखी पडलेल्या दांपत्याचे नाव उदयलाल आणि नर्मदाबाई असे आहे. स्फोट झाल्यानंतर उदयचे शिर सुमारे 45 फूट दूर अंतरावर जाऊन पडले तर पत्नीचे शिर छतावर सापडले.
मधुकुमारन यांनी सांगितले, की प्लॅस्टिकच्या एका वस्तूमध्ये स्फोटके ठेवण्यात आले होते. त्यांचा स्फोट घडविण्यात आला. उदयने काही दिवसांपूर्वीच दुसरे लग्न केले होते. पत्नीसोबत त्याचा वाद सुरु होता. राजस्थानमधील एका मायनिंग कंपनीत तो नोकरी करीत होता. तेथूनच त्याने स्फोटके आणली असावीत. दोघांनी आत्महत्या केल्या, की पत्नीला ठार मारण्याच्या प्रयत्नात दोघे मृत्युमुखी पडले याचाही तपास पोलिस करीत आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, स्फोट झाल्यावर मृतदेहाच्या झाल्या चिंध्या... त्याचे शीर 45 फूट अंतरावर मिळाले.... घराची अशी झाली अवस्था...
(टीप- कमकुवत हृदयाच्या लोकांनी हे फोटो बघू नयेत...)