आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीला प्रेमाने विचारली अंतिम इच्छा, मग उत्तर मिळण्याआधीच केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - नातेवाइकाच्या घरी भेटायला आलेल्या पत्नीला पतीने मंदिरात जाण्याच्या बहाण्याने जंगलात नेले. जंगलात एका झाडाखाली तिला उभी करून शेवटची इच्छा विचारली. पत्नीला काही कळण्याआधीच त्याने कुऱ्हाडीने तिच्या मानेवर वार केले. यानंतर पत्नीसह आलेल्या पुतणीवरही कुऱ्हाडीने वार करून पळून गेला. यानंतर लोकांनी जखमी महिला आणि मुलीला रुग्णालयात नेले.


असे आहे प्रकरण...
गोहदमध्ये राहणारे सत्यभान यांची पत्नी राणी आपल्या नणंदेला भेटायला मंगळवारी ग्वाल्हेरात आली होती. संध्याकाळी सत्यभान राणीला म्हणाला की, शीतला माता मंदिरात जाऊ. यावर राणी तयार झाली. तेव्हा भाची कृष्णाही सोबत निघाली. तिघेही कॅन्सर हॉस्पिटलच्या टेकडीवर पोहोचले. येथे बाइक थांबवून त्याने बॅगमधून कुऱ्हाड काढली आणि राणीला म्हणाला, सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे. राणीला काही कळण्याआधीच त्याने कुऱ्हाडीने मानेवार वार केला.
- राणी रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध झाली. यानंतर सत्यभानने कुऱ्हाडीने आपली भाची कृष्णावरही वार केले. तथापि, हे वार त्याने कुऱ्हाडीने लाकडाने केले.
- राणीला मृत समजून सत्यभान तेथून पळून गेला. यादरम्यान काही वाटसरू निघाले. त्यांनी रडण्याचा आवाज ऐकला. लोकांनी पाहिले की एक मुलगी रक्तबंबाळ पडलेल्या महिलेजवळ रडत उभी आहे.
- यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिस पोहोचले आणि जखमी राणी व कृष्णाला लगेच रुग्णालयात नेले. येथे शुद्धीत आल्यावर राणीने घटनेची माहिती दिली.

 

पोलिस घेताहेत पतीचा शोध
- आता पोलिसांनी फरार सत्यभानचा शोधू सुरू केला आहे. दुसरीकडे राणीची प्रकृती अतिरक्तस्रावामुळे चिंताजनक आहे. कृष्णाची तब्येत ठीक असल्याचे समजते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेशी निगडित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...