आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारादरम्यान पत्नीला झाली गर्मी, संपूर्ण वॉर्डमध्ये लावली कुलिंग सिस्टिम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- किमोथेरेपी वॉर्डमध्ये कुटुंबासोबत सुब्रत रॉय.)
भोपाळ- पत्नीला किमोथेरेपीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरु असलेल्या वॉर्डमध्ये कुलिंग सिस्टिम नव्हती. पत्नीला प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागत होते. उपचारासाठी प्रयत्नांची शर्थ करण्यात आली. पण पत्नी वाचू शकली नाही. त्यानंतर पत्नीच्या स्मरणार्थ संपूर्ण वॉर्डमध्ये एअर कुलिंग सिस्टिम बसविण्याचा निर्णय पतीने घेतला. आता जनरल वॉर्डमध्येही अगदी एसी सारखा गारवा जाणवत आहे.
देवश्री राय यांना ब्रेस्ट कॅन्सर होता. त्यांना उपचारासाठी जवाहरलाल नेहरु कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी किमोथेरेपी उपचार सुरु केले. यावेळी त्यांना ज्या वॉर्डात दाखल करण्यात आले होते तेथे कुलिंग सिस्टिम नव्हती. प्रचंड गर्मी होत होती. यामुळे देवश्री यांना प्रचंड उकाडा सहन करावा लागला. यात फेब्रुवारी 2014 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे पती प्रो. सुब्रत राय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टिचर ट्रेनिंग अॅंड रिसर्चमध्ये (एनआयटीटीआर) कार्यरत आहेत.
गर्मीमुळे देवश्री यांना अखेरच्या दिवसांमध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. याची जाणीव सुब्रत यांना होती. त्यामुळे पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी संपूर्ण वॉर्डमध्ये एअर कुलिंग सिस्टिम लावली. यासाठी त्यांना 9 लाख रुपये खर्च आला. या वॉर्डात एकूण 54 रुग्णांची व्यवस्था आहे. यापूर्वी त्यांनी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी रुग्णालयाच्या परिसरात एक बोअरही केले आहे. त्यासाठी सुमारे 2 लाख रुपये खर्च आला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, अशी बसविली कुलिंग सिस्टिम... रुग्णांशी साधतात संवाद... आस्थेने करतात चौकशी...